वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w11 १०/१ पृ. १०-११
  • तुला कधी तिऱ्‍हाईतासारखे वाटले आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुला कधी तिऱ्‍हाईतासारखे वाटले आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • मिळती जुळती माहिती
  • अन्याय झाला तरी त्याने मनात राग बाळगला नाही
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • ते त्यांच्या शरीरातल्या काट्यांशी लढले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • दावीदने एकनिष्ठ प्रेम दाखवलं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
w11 १०/१ पृ. १०-११

तुमच्या मुलांना शिकवा

तुला कधी तिऱ्‍हाईतासारखे वाटले आहे का?

इतर जण एखाद्या व्यक्‍तीला टाळतात तेव्हा तिला तिऱ्‍हाईतासारखे वाटू शकते. त्या व्यक्‍तीचा कदाचित त्वचारंग वेगळा असेल, ती कदाचित वेगळ्या राष्ट्राची असेल किंवा तिची बोलण्याची अथवा काम करण्याची पद्धत वेगळी असेल. तुला कधी असे तिऱ्‍हाईतासारखे वाटले आहे का?—a

एका मनुष्याला असेच वाटले होते. त्याच्याबद्दल आपण बोलू यात. त्याचे नाव होते मफीबोशेथ. मफीबोशेथ कोण होता आणि त्याला असे का वाटत होते ते आपण पाहू या. तुला जर तिऱ्‍हाईतासारखे वाटत असेल तर, तू मफीबोशेथाकडून पुष्कळ काही शिकू शकतोस.

मफीबोशेथ हा दावीदाचा जिवलग मित्र योनाथान याचा मुलगा होता. योनाथान एका युद्धात जखमी झाला. मरायच्या आधी तो दाविदाला म्हणाला: ‘माझ्या मुलांची काळजी घे.’ त्यानंतर दावीद राजा झाला. खूप वर्षांनंतर त्याला योनाथानाचे शब्द आठवले. आणि मफीबोशेथ अजूनही जिवंत होता. पण लहानपणी झालेल्या एका अपघातामुळे तो कायमचा लंगडा झाला होता. आता तुला समजले का, मफीबोशेथला तिऱ्‍हाईतासारखे का वाटत होते ते? —

दाविदाला योनाथानच्या या मुलाची काळजी घ्यायची होती. म्हणून त्याने त्याची, जेरूसलेमेतील आपल्या घराशेजारी राहायची आणि आपल्या बरोबर जेवण करायची व्यवस्था केली. त्याने सीबा नावाच्या एका माणसाला त्याचे कुटुंब आणि त्याचे सेवक यांच्यासहित मफीबोशेथची काळजी घेण्यासाठी नेमले. अशा प्रकारे दाविदाने योनाथानच्या पुत्राचा सन्मान केला. पण मग पुढे काय झाले माहीत आहे?—

दावीदाच्या घरातले लोक दाविदाला त्रास देऊ लागले. अबशालोम नावाचा त्याचा मुलगा त्याच्या जिवावर उठला कारण त्याला राजा व्हायचे होते. त्यामुळे मग दाविदाला आपला जीव वाचवण्यासाठी तेथून पळून जावे लागले. दाविदाबरोबर इतरही पुष्कळ लोक गेले. आणि मफीबोशेथलाही जायचे होते. कारण दावीदाच्या या मित्रांना माहीत होते, की दावीदच खरा राजा आहे. पण, मफीबोशेथला जाता आले नाही कारण तो धड चालूसुद्धा शकत नव्हता.

पण मग सीबाने दाविदाचे कान भरले. त्याने त्याला म्हटले, की मफीबोशेथ तुझ्याबरोबर मुद्दामहून आला नाही कारण खरे तर त्याला राजा व्हायचे आहे. आणि दाविदाने सीबाने सांगितलेल्या या लबाडीवर विश्‍वास ठेवला. त्याने, मफीबोशेथची सर्व संपत्ती सीबाला देऊन टाकली. त्यानंतर अबशालोमबरोबर झालेल्या युद्धात दावीद जिंकला व तो पुन्हा जेरुसलेमेत आला. इथे आल्यावर त्याला मफीबोशेथची बाजू ऐकायची होती. ती त्याने ऐकली. ऐकल्यानंतर त्याने ठरवले, की मफीबोशेथ आणि सीबा या दोघांमध्ये संपत्तीची वाटणी झाली पाहिजे. अशा वेळी मफीबोशेथने काय केले असावे असे तुला वाटते?—

दावीदाने चुकीचा निर्णय दिला, अशी बिलकूल कुरकूर त्याने केली नाही. दाविदाकडे पुष्कळ काम आहे, तेव्हा हे काम त्याला शांतीने करता यावे म्हणून तो गप्प राहिला. उलट, सीबानेच सर्व संपत्ती घ्यावी, असेही तो म्हणाला. यहोवाचा सेवक दावीद जेरुसलेमेत पुन्हा आला होता, हीच मफीबोशेथसाठी मोठी गोष्ट होती.

मफीबोशेथला खूप त्रास सहन करावा लागला होता. सर्व लोक आपल्याला टाळतात, आपण तिऱ्‍हाईत आहोत, असे त्याला वाटायचे. पण यहोवाचे त्याच्यावर प्रेम होते आणि म्हणून यहोवाने त्याची काळजी घेतली. मफीबोशेथच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो बरे?— कधीकधी आपण बरोबर असलो तरीसुद्धा काही लोक आपल्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवतील. येशूने म्हटले होते: “जग जर तुमचा द्वेष करिते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाहि केला आहे हे तुम्हाला माहीत आहे.” लोकांनी तर येशूला ठारही मारले. पण आपल्याला माहीत आहे, की आपण जर जे बरोबर आहे ते करत राहिलो तर खरा देव यहोवा आणि त्याचा पुत्र येशू आपल्यावर प्रेम करतील. (w११-E ०६/०१)

तुमचे बायबल उघडून वाचा

१ शमुवेल २०:१५-१७, ४१, ४२

२ शमुवेल ४:४; ९:१-१०; १९:२४-३०

योहान १५:१८

[तळटीप]

a तुम्ही हा लेख आपल्या मुलाला वाचून दाखवत असाल तर, लेखात काही वाक्यांच्या पुढे जेव्हा एक छोटीशी रेघ तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही तेथे थांबून तुमच्या मुलाला काय वाटते ते विचारायचे आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा