वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w08 ११/१५ पृ. ६-७
  • ‘एकदिलाने व एकजिवाने’ देवाची सेवा करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘एकदिलाने व एकजिवाने’ देवाची सेवा करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • मिळती जुळती माहिती
  • औदार्याने द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • ‘बांधवांच्या मदतीसाठी हातभार लावण्याच्या बहुमानाचा’ तुम्हाला आनंद होतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • चला, आपण यहोवाला भेट अर्पण करू या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • “परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धि देतो”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
w08 ११/१५ पृ. ६-७

‘एकदिलाने व एकजिवाने’ देवाची सेवा करणे

येशूच्या शिष्यांभोवती यहुदी व यहुदी धर्म स्वीकारलेले लोक जमले आहेत. हे सर्व लोक खूप लांबून म्हणजेच पुर्वेकडील पार्थिया, तसेच पश्‍चिमेकडील रोम येथून जेरूसलेममध्ये पेन्टेकॉस्टचा सण साजरा करायला आले आहेत. या लोकांशी येशूचे शिष्य त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलत आहेत. पण हे कसे शक्य आहे? कारण येशूचे शिष्य तर गालीली आहेत. हे पाहून गोंधळलेल्या लोकांपैकी काही जण विचारतात: “आपण प्रत्येक जण आपआपली जन्मभाषा ऐकतो हे कसे?” —प्रे. कृत्ये २:८.

तेव्हा प्रेषित पेत्र उभा राहून त्यांच्यासमोर घडत असलेल्या या चमत्काराचे कारण समजावून सांगतो. त्याचे भाषण ऐकून लोक लगेच प्रतिसाद देतात आणि हजारो नवीन लोक बाप्तिस्मा घेतात! (प्रे. कृत्ये २:४१) मंडळीची झपाट्याने वाढ होऊ लागते, पण तरीसुद्धा तिच्यात एकता असते. बायबल लेखक लूकने सांगितल्याप्रमाणे: “विश्‍वास धरणाऱ्‍यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता.”—प्रे. कृत्ये ४:३२.

सा.यु. ३३ मधील पेन्टेकॉस्टच्या दिवशी बाप्तिस्मा घेतलेल्या हजारो जणांना, आणखी थोडे दिवस जेरूसलेमात राहून आपल्या नवीन विश्‍वासाबद्दल अधिक शिकून घ्यायचे होते. पण ते जास्त दिवस राहण्याच्या इराद्याने आले नव्हते. म्हणून, त्यांच्या गरजा भागवण्याकरता एक निधी उभारण्यात आला. विश्‍वासूजनांपैकी काहींनी आपली मालमत्ता विकून मिळालेली रक्कम गरजवंताना द्यावी म्हणून प्रेषितांकडे आणून दिली. (प्रे. कृत्ये २:४२-४७) प्रीती आणि उदारता यांचे किती उत्तम उदाहरण!

खरे ख्रिस्ती नेहमीच अशा प्रकारची प्रीती व औदार्याची मनोवृत्ती दाखवत आले आहेत. आजही ख्रिस्ती मंडळी ‘एकदिलाने व एकजिवाने’ यहोवाची उपासना करीत आहे. मंडळीतील सदस्य आपला वेळ, शक्‍ती व पैसा, सुवार्तेच्या प्रचारासाठी व देवाच्या राज्याशी संबंधित कार्यांना हातभार लावण्यासाठी उदारतेने खर्ची घालतात.—“दान देण्यासाठी काही जण निवडत असलेले मार्ग,” असे शीर्षक असलेली पेटी पाहा.

[६, ७ पानांवरील चौकट]

दान देण्यासाठी काहीजण निवडत असलेले मार्ग

जगभरात चाललेल्या कार्यासाठी दान

“जगभरात होणाऱ्‍या कार्यासाठी” असे लिहिलेल्या दान पेटीत दान टाकण्यासाठी बरेच लोक ठराविक रक्कम बाजूला ठेवतात.

दर महिन्याला मंडळ्या ही रक्कम संबंधित देशातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाला पाठवतात. पैशाचे स्वेच्छिक दान देखील सरळ या शाखा कार्यालयांना पाठवले जाऊ शकते. शाखा कार्यालयांचे पत्ते या पत्रिकेच्या पृष्ठ २ वर सापडतील. चेक असतील तर ते “वॉच टावर”लाa देय असावेत. याशिवाय, दागदागिने किंवा इतर मोलवान वस्तुसुद्धा दान केल्या जाऊ शकतात. विशिष्ट वस्तू देणगी म्हणून दिल्या जात आहेत असा उल्लेख केलेले एक संक्षिप्त पत्रही त्यासोबत पाठवणे आवश्‍यक आहे.

सशर्त-दान योजनाb

काही देशांमध्ये पैसे अशा खास योजनेत दान केले जाऊ शकतात ज्यामध्ये दात्याला ते हवे असल्यास परत केले जाऊ शकतात. अधिक माहितीसाठी तुमच्या देशात कार्य करणाऱ्‍या स्थानिक शाखा कार्यालयाशी कृपया संपर्क साधावा.

धर्मादाय योजनाc

पैशांची देणगी आणि पैशांची सशर्त देणगी यांव्यतिरिक्‍त जगभरातील राज्य सेवेच्या लाभाकरता तुम्ही राहता त्या देशानुसार देणगी देण्याचे इतरही मार्ग आहेत. ते असे आहेत:

विमा: वॉच टावर संस्थेला जीवन विमा पॉलिसीचे किंवा रिटायर्मेन्ट/पेन्शन योजनेचे हिताधिकारी बनवले जाऊ शकते.

बँक खाते: बँक खाते, जमा प्रमाण-पत्र किंवा वैयक्‍तिक निवृत्ती खाते स्थानिक बँकेच्या नियमांनुसार वॉच टावर संस्थेला ट्रस्ट म्हणून तुम्ही देऊ शकता किंवा मग मृत्यूनंतर ते संस्थेला मिळेल अशी व्यवस्था करू शकता.

स्टॉक्स आणि बाँड्‌स: स्टॉक्स आणि बाँड्‌स देखील वॉच टावर संस्थेला थेट दान केले जाऊ शकतात.

जमीन-जुमला: विकाऊ जमीन-जुमला थेट दानाच्या स्वरूपात दिला जाऊ शकतो; किंवा निवासी संपत्ती असल्यास, ती संस्थेच्या नावावर करून जिवंत असेपर्यंत तिचा वापर केला जाऊ शकतो. आपला जमीन-जुमला संस्थेच्या नावावर करण्याआधी तुमच्या देशातील शाखा कार्यालयाशी संपर्क साधा.

दानाची वार्षिक नेमणूक: दानाची वार्षिक नेमणूक ही अशी व्यवस्था आहे ज्यात वॉच टावर संस्थेच्या नावावर पैसे किंवा सुरक्षितता केली जाते. त्याच्या बदल्यात, दात्याला किंवा दात्याने ठरवलेल्या एका व्यक्‍तीला आयुष्यभर दर वर्षाला एक नेमलेली रक्कम मिळते. दानाची वार्षिक नेमणूक ज्या वर्षी ठरवली जाते त्या वर्षी दात्याला आय-करात काही सूट मिळते.

इच्छा-पत्र आणि ट्रस्ट: कायदेशीर इच्छा-पत्रामार्फत तुम्ही तुमची संपत्ती किंवा पैसा कायद्याने वॉच टावर संस्थेच्या नावावर करू शकता किंवा वॉच टावरd संस्थेला ट्रस्ट ॲग्रीमेंटचे हिताधिकारी बनवून आपले इच्छा-पत्र तयार करू शकता. काही देशांत एखादी धार्मिक संस्था ट्रस्टची हिताधिकारी असल्यास करात काही सवलती प्राप्त होऊ शकतात पण भारताच्या बाबतीत हे लागू होत नाही.

“धर्मादाय योजना” या शब्दांशावरून सूचित होते त्याप्रमाणे अशा प्रकारच्या दानांकरता दात्याला काही प्रमाणात योजना करावी लागते. यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक कार्याला धर्मादाय योजनेद्वारे साहाय्य करू इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तींची मदत करण्यासाठी इंग्रजी व स्पॅनिश भाषेत चॅरिटेबल प्लॅनिंग टू बेनेफिट किंगडम सर्व्हिस वर्ल्डवाईडe हे माहितीपत्रक तयार करण्यात आले आहे. एखादी व्यक्‍ती आता किंवा मृत्यूनंतर आपल्या मृत्यूपत्रानुसार आपली मालमत्ता भेट म्हणून कोणकोणत्या प्रकारे देऊ शकेल, याबाबतीत अधिक माहिती पुरवण्यासाठी हे माहितीपत्रक लिहिण्यात आले होते. माहितीपत्रक वाचल्यानंतर आणि स्वतःच्या कायदा किंवा कर सल्लागारांचा आणि धर्मादाय योजना कार्यालयाचा सल्ला घेऊन अनेकांना जगभरात यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला हातभार लावता आला आहे आणि त्याच वेळी असे केल्याने मिळणारे कर फायदे देखील वाढवता आले आहेत.

अधिक माहितीसाठी, तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांशी पत्रव्यवहाराद्वारे किंवा टेलिफोनद्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा तुमच्या देशाचा कारभार पाहणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

Jehovah’s Witnesses,

Post Box ६४४०,

Yelahanka,

Bangalore ५६० ०६४,

Karnataka.

Telephone: (०८०) २८४६८०७२

[तळटीपा]

a भारतात हे चेक “द वॉच टावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया”ला देय असावेत

b भारताला हे लागू होत नाही

c सूचना: कराच्या बाबत असलेले नियम विविध देशांत वेगवेगळे असतील. कराच्या नियमाविषयी व योजनेविषयी मत घेण्यासाठी कृपया तुमच्या अकाऊंटंटशी किंवा वकिलाशी संपर्क साधावा. शेवटचा निर्णय घेण्याआधी कृपया स्थानिक शाखा कार्यालयाशी देखील संपर्क साधावा.

d भारतात “द वॉच टावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया” हे नाव वापरावे

e भारतात उपलब्ध नाही

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा