वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w08 ७/१ पृ. ३२
  • क्षमा करण्यास तयार असलेला देव

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • क्षमा करण्यास तयार असलेला देव
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्या गुरूकडून तो क्षमा करण्यास शिकला
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • तो आपल्या धन्याकडून क्षमा करण्याचा धडा शिकतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • परीक्षाप्रसंगांतही त्यानं एकनिष्ठा सोडली नाही
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • पेत्रप्रमाणे हार न मानता प्रयत्न करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
w08 ७/१ पृ. ३२

देवाच्या जवळ या

क्षमा करण्यास तयार असलेला देव

योहान २१:१५-१७

“हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस.” (स्तोत्र ८६:५) या दिलासा देणाऱ्‍या शब्दांत बायबल आपल्याला आश्‍वासन देते की यहोवा उदारतेने क्षमा करतो. यहोवा “भरपूर क्षमा” करतो हे प्रेषित पेत्राच्या जीवनात घडलेल्या एका घटनेतून आपल्याला स्पष्टपणे दिसते.—यशया ५५:७.

पेत्र, येशूच्या जवळच्या सहकाऱ्‍यांपैकी एक होता. तरीपण, येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटल्या रात्री, मानवांच्या भीतीपुढे नमते घेऊन त्याने एक गंभीर पाप केले. येशूची बेकायदेशीर रीत्या न्यायचौकशी करण्यात येत होती तेथे जवळच एका अंगणात पेत्राने सर्वांपुढे येशूला ओळखत असल्याचे नाकारले, एकदा नव्हे तर तीनदा. पेत्राने, येशूला तिसऱ्‍यांदा कडकडून नाकारले, तेव्हा लगेच येशूने “वळून पेत्राकडे दृष्टि लावली.” (लूक २२:५५-६१) येशूने पेत्राकडे पाहिले तेव्हा पेत्राला कसे वाटले असावे याची तुम्ही कल्पना करू शकता का? आपले पाप किती गंभीर आहे याची पेत्राला जाणीव झाली तेव्हा “त्याचे अवसान सुटले व संकोच न करिता मोठा गळा काढून तो रडू लागला.” (मार्क १४:७२) पश्‍चात्तापी पेत्राला वाटले असावे की त्याने तीनदा येशूला ओळखत असल्याचे नाकारल्यामुळे देव त्याला क्षमा करेल का?

येशूच्या पुनरुत्थानंतर, येशू पेत्राशी बोलला तेव्हा पेत्र क्षमेस पात्र आहे की नाही याविषयी पेत्राच्या मनात असलेल्या शंका नक्कीच नाहीशा झाल्या. येशू पेत्राला एकही कठोर शब्द बोलला नाही की त्याने त्याची निंदा केली नाही. त्याऐवजी, येशूने पेत्राला विचारले: ‘तू माझ्यावर प्रीति करितोस काय?’ पेत्राने उत्तर दिले: “होय, प्रभू, आपणावर मी प्रेम करितो, हे आपणाला ठाऊक आहे.” येशूने त्याला म्हटले: “माझी कोकरे चार.” येशूने दुसऱ्‍यांदा तोच प्रश्‍न विचारला, पेत्राने कदाचित थोडा जोर देऊन आधीसारखेच उत्तर दिले. येशूने म्हटले: “माझी मेंढरे पाळ.” येशूने पुन्हा तोच प्रश्‍न तिसऱ्‍यांदा विचारला: “माझ्यावर प्रेम करितोस काय?” आता “पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे; मी आपणावर प्रेम करितो हे आपण ओळखले आहे.” येशू त्याला म्हणाला: “माझी मेंढरे चार.”—योहान २१:१५-१७.

येशूला ज्या प्रश्‍नांचे उत्तर आधीपासूनच माहीत होते, ते प्रश्‍न त्याने का विचारले? लोकांच्या मनात काय आहे हे येशू ओळखू शकत होता, त्यामुळे त्याला माहीत होते की पेत्राचे त्याच्यावर प्रेम आहे. (मार्क २:८) ते प्रश्‍न विचारण्याद्वारे, येशूवर पेत्राचे खरोखर प्रेम असल्याचे तीन वेळा बोलून दाखवण्याची येशूने त्याला संधी दिली. “माझी कोकरे चार. . . . माझी मेंढरे पाळ. . . . माझी मेंढरे चार,” असे येशूने पेत्राला म्हटल्यामुळे पश्‍चात्तापी पेत्राची पुन्हा एकदा खात्री पटली की तो भरवशालायक होता. म्हणूनच तर, येशू त्याला अत्यंत मूल्यवान संपत्तीची म्हणजेच येशूच्या मेंढरांसमान अनुयायांची काळजी घेण्यास सांगत होता. (योहा. १०:१४, १५) येशू आताही त्याच्यावर भरवसा करतो हे जाणून त्याला नक्कीच हायसे वाटले असावे!

येशूने आपल्या पश्‍चात्तापी प्रेषिताला क्षमा केली यात काही शंका नाही. येशू आपल्या पित्याचे पूर्णपणे अनुकरण करतो, त्यामुळे आपण या निष्कर्षावर पोहचू शकतो की यहोवाने देखील पेत्राला क्षमा केली. (योहान ५:१९) यहोवा क्षमा करण्यास अनिच्छुक नाही, तर तो दयाळू देव आहे आणि पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांप्रती “क्षमाशील” आहे. ही गोष्ट तुम्हाला सांत्वन देत नाही का? (w०८ ६/१)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा