वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w06 १०/१ पृ. ३२
  • शरीर थकले तरी उत्साह कायम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शरीर थकले तरी उत्साह कायम
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
w06 १०/१ पृ. ३२

शरीर थकले तरी उत्साह कायम

वृद्धापकाळ येता, बरेचजण अशक्‍त, अधू होतात. ते इतर लोकांमध्ये मिसळण्याचे सोडून देतात. पण जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे वयाच्या ९५ व्या वर्षी मरण पावलेल्या फर्नंड रीव्हारोल यांच्या बाबतीत मात्र असे घडले नव्हते. पत्नीचा मृत्यू झाल्यावर व मुलीचा विवाह झाल्यावर, ते एकटेच राहात होते. ते क्वचितच घराबाहेर पडायचे. पण तरीसुद्धा ते एकाकी नव्हते. सहसा बैठकीतल्या एका टेबलाजवळ बसून, ते लोकांना फोन करायचे व त्यांच्याशी आध्यात्मिक विषयांवर संभाषण करायचे.

फर्नंड यांना आपल्या सबंध जीवनात अनेक रोमांचक अनुभव आले. एकदा त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. का बरे? कारण फर्नंड व त्यांच्या पत्नी यहोवाचे सक्रिय साक्षीदार बनल्यावर लगेच, म्हणजे १९३९ साली युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले. फर्नंड यांनी बायबलच्या आधारावर हा निर्णय घेतला होता की ते युद्धात भाग घेऊन कोणाविरुद्ध शस्त्र उचलणार नाहीत आणि या निर्णयावर ते ठाम होते. त्यामुळे त्यांची नोकरी गेली आणि त्यांना कित्येकदा तुरुंगात टाकण्यात आले. त्यांनी एकूण साडेपाच वर्षे तुरुंगात घालवली आणि या काळात त्यांना आपली बायको व चिमुकल्या मुलीपासून दूर राहावे लागले.

मागे वळून पाहताना, फर्नंड यांनी म्हटले: “बऱ्‍याच लोकांचे असे मत होते की चांगली नोकरी सोडून मी आपल्या कुटुंबावर अन्याय केला आहे. त्यांनी मला वेड्यात काढले आणि एखाद्या गुन्हेगारासमान माझ्याशी व्यवहार केला. तरीपण जेव्हा मी त्या कठीण वर्षांची आठवण करतो तेव्हा इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा, यहोवाने आम्हाला कसे सांभाळले व साहाय्य केले हेच मला ठळकपणे आठवते. त्या घटनांना आता कित्येक वर्षे झाली आहेत पण यहोवावरचा माझा भरवसा तेव्हा होता तितकाच आजही भक्कम आहे.”

या दृढ विश्‍वासानेच फर्नंड यांना फोनवरून इतरांना आपल्या आशेविषयी सांगण्याची प्रेरणा दिली. एखाद्या व्यक्‍तीशी चांगले संभाषण झाल्यास ते त्या व्यक्‍तीला बायबलवर आधारित साहित्य पाठवायचे. नंतर पुन्हा फोन करून त्या व्यक्‍तीला ते साहित्य आवडले किंवा नाही याची ते खात्री करायचे. कधीकधी लोक त्यांना आभार व्यक्‍त करण्याकरता पत्र पाठवायचे, तेव्हा त्यांना खूपच आनंद व्हायचा.

कदाचित तुमच्या परिसरात, फर्नंड यांच्यासारखीच एखादी व्यक्‍ती तुमच्याशी संपर्क साधेल. आपल्या विश्‍वासासंबंधी त्यांना काय सांगायचे आहे हे ऐकून घ्यायला तुम्हाला आवडेल का? यहोवाच्या साक्षीदारांना आपल्या विश्‍वसांविषयी तुम्हाला सांगण्यास केव्हाही आनंदच वाटेल. (w०६ ८/१५)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा