वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w06 ८/१ पृ. ३२
  • “आज माझी खात्री पटली, की खरंच देव आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “आज माझी खात्री पटली, की खरंच देव आहे”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
w06 ८/१ पृ. ३२

“आज माझी खात्री पटली, की खरंच देव आहे”

चे क रिपब्लिकच्या प्राग या शहरात राहणारी ॲलिक्सांड्रा नावाची युक्रेनियन स्त्री, एके दिवशी नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतत होती. ती बस-स्थानकावर आली तेव्हा तिला एक लहानशी पर्स जमिनीवर पडलेली दिसली. येणारे जाणारे लोक ती पर्स तुडवून पुढे जात होते. तिने ती पर्स उचलून उघडून पाहिली तेव्हा तिला आपल्या डोळ्यांवर विश्‍वास बसेना. पर्समध्ये चक्क ५,०००-कोरूना नोटांचा पुडका होता! आजूबाजूला पाहिले तर कोणीही ती हरवलेली पर्स शोधताना दिसत नव्हते. शिवाय, ॲलिक्सांड्रा चेक रिपब्लिकमध्ये एक परदेशी रहिवासी असल्यामुळे ती फार मुश्‍किलीने गुजराण करत होती. मग, तिला ती पर्स ठेवून घेण्याचा मोह झाला का?

घरी परतल्यावर ॲलिक्सांड्राने ती पर्स व्हिक्टोरिया या आपल्या मुलीला दाखवली. त्यांनी पर्समध्ये नाव, पत्ता आहे का म्हणून शोधले पण त्यांना काही सापडले नाही. एका लहानशा चिटोऱ्‍यावर मात्र काही नंबर लिहिलेले होते. कागदाच्या एका बाजूला बँकेचा अकाऊंट नंबर होता आणि दुसऱ्‍या बाजूला आणखी काही आकडे. पर्समध्ये, शहरातच असलेल्या एका बँकेपर्यंत कसे पोचायचे याविषयी काही सूचना लिहिलेल्या होत्या आणि एका चिट्ठीवर “३,३०,००० कोरूनी” (जवळजवळ १०,००० यु.एस. डॉलर किंवा ४,५०,००० रुपये) ही संख्या लिहिली होती. पर्समध्ये नेमकी इतकीच रक्कम होती.

ॲलिक्सांड्राने कागदावर लिहिलेला एक नंबर बँकेचा फोन नंबर समजून फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तो काही लागला नाही. तेव्हा ती आपल्या मुलीसोबत बँकेत गेली आणि तिने अधिकाऱ्‍यांना घडलेली सगळी हकिगत सांगितली. बँकवाल्यांनी तिला पर्समध्ये सापडलेला अकाऊंट नंबर विचारला पण त्या नंबरचे खाते बँकेत नव्हते. दुसऱ्‍या दिवशी, ॲलिक्सांड्रा कागदावरचा दुसरा नंबर घेऊन बँकेत गेली. या नंबरचे बँकेत जे अकाऊंट होते ते एका स्त्रीचे होते. ॲलिक्सांड्रा व व्हिक्टोरिया यांनी त्या स्त्रीशी संपर्क साधला आणि तिने आपलीच पर्स हरवली असल्याचे सांगितले. शेवटी त्या सर्वांची समोरासमोर भेट झाली तेव्हा त्या स्त्रीने त्यांचे मनापासून आभार मानले आणि “पैसे परत करण्यासाठी तुमच्या काही अटी आहेत का?” असे त्यांना विचारले.

व्हिक्टोरियाने उत्तर दिले: “कोणत्याच अटी नाहीत. आम्हाला हे पैसे हवे असते तर आम्ही ते ठेवून घेतले असते.” आपल्या तोडक्या मोडक्या चेक भाषेत तिने त्या स्त्रीला समजावून सांगितले, की “आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत आणि म्हणून आम्ही तुमचे पैसे तुम्हाला परत करत आहोत. आम्हाला मिळालेल्या बायबलच्या शिक्षणामुळे, आमचा विवेक दुसऱ्‍या कोणाचे पैसे ठेवून घ्यायला कधीही तयार होणार नाही.” (इब्री लोकांस १३:१८) हे ऐकून त्या स्त्रीला इतका आनंद झाला की ती म्हणाली, “आज माझी खात्री पटली, की खरंच देव आहे.” (w०६ ७/१५)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा