मतपरिवर्तन करणारी भेट
“देवानं माझ्याकडे दोन ‘देवदूतांना’ पाठवलं होतं, हे केव्हा एकदा मी आपल्या कुटुंबाला सांगेन असं मला झालं होतं.” असे एका सद्गृहस्थाने लिहिले. यहोवाच्या साक्षीदार असलेल्या दोन तरुण मुली त्यांच्याकडे सुवार्ता सांगायला गेल्या होत्या. या मुली त्याच्याकडे जायच्या काही आठवड्यांआधी या गृहस्थाच्या ४५ वर्षीय पत्नीचा मृत्यू झाला होता. तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. त्याच्या प्रौढ मुलांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण ते त्याच्यापासून दूर राहत होते. त्याला भेटायला कोणीही मित्र किंवा शेजारचे लोक गेले नव्हते.
जेव्हा या दोन भगिनी त्या गृहस्थाला भेटल्या तेव्हा तो त्यांना म्हणाला: “मी देवाला प्रार्थनाच करायची सोडून दिली आहे.” पण आपल्या बहिणींनी त्याला सहानुभूती दाखवली आणि आपल्या मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा आहे? (इंग्रजी) ही लहानशी बायबल आधारित पत्रिका वाचायला दिली. त्याने त्याच संध्याकाळी ती पत्रिका वाचून काढली. त्याला त्यातून सांत्वन मिळाले.
काही दिवसांनी या दोघी ख्रिस्ती मुली पुन्हा या गृहस्थाला भेटायला गेल्या. मागे आम्ही आलो होतो तेव्हा तुम्ही खूप दुःखी होता म्हणून आज आम्ही तुम्हाला सहज भेटायला आलो, असे त्यांनी त्याला सांगितलं. “या दोघी, ना माझ्या ओळखीच्या ना पाळखीच्या पण माझ्याबद्दल त्यांना किती काळजी आहे, याचं मला खूप आश्चर्य वाटलं!” असे त्याने पुढे लिहिले. या दोघींनी त्याला बायबलमधून ज्या गोष्टी दाखवल्या त्यामुळे त्याला खूप उत्तेजन मिळाले. आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला येऊ, असे या दोघींनी त्याला सांगितले. या सद्गृहस्थाला इतका आनंद झाला की त्याने वर उल्लेखलेले आपले मत एका पत्रात लिहिले आणि ते यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानीय राज्य सभागृहाला पाठवले.
आपल्या मुलांच्या जवळपास राहायला जाण्याआधी तो यहोवाच्या साक्षीदारांच्या एका ख्रिस्ती सभेला उपस्थित राहिला आणि दोन मुलींपैकी एका मुलीच्या कुटुंबाने त्याला घरी जेवायला बोलवले. त्याने लिहिले: “मी इथून जात आहे. पण या दोन मुली आणि तुमचं चर्च नेहमी माझ्या आठवणीत राहील व मी तुमच्यासाठी प्रार्थनाही करेन. आणि हो, आता मी पुन्हा देवाला खूप प्रार्थना करायला सुरूवात केली आहे. माझं मतपरिवर्तन झालं आहे. या तरुणींची त्यात महत्त्वाची भूमिका होती. मी सदा त्यांचा आभारी राहीन.” (w०६ ७/१)