आश्चर्याची भावना तुमच्यामध्ये आहे का?
देवाच्या कार्यांची व गुणांची प्रशंसा करताना बायबल लेखक वारंवार आश्चर्याची भावना जागृत करतात, याची कधी तुम्ही नोंद घेतली आहे का? स्तोत्रकर्त्याने म्हटले: “अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे.” (स्तोत्र १३९:१४) संदेष्टा यशया याने लिहिले: “हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस; मी तुझी थोरवी वर्णीन, तुझ्या नामाचे स्तवन करीन कारण तू आश्चर्यकारक कृत्ये केली आहेस.” (यशया २५:१) किंवा, प्रेषित पौलाच्या शब्दांतून व्यक्त होणारे आश्चर्य आणि भीतीयुक्त आदर यांचा विचार करा: “अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ति किती अगाध आहे!”—रोमकर ११:३३.
द ऑक्सफर्ड एन्सायक्लोपिडिआ इंग्लिश डिक्शनरी “आश्चर्य” या शब्दाची व्याख्या, “अनपेक्षित, अनोळखी, किंवा न उलगडणाऱ्या एखाद्या गोष्टीमुळे उत्तेजित होणारी भावना; खासकरून, कौतुक किंवा कुतूहलाच्या भावनेसोबत असलेले विस्मय, वगैरे” अशी करते.
लहान मुले जेव्हा त्यांना नवीन वाटणारी एखादी गोष्ट पाहतात, एखादी गोष्ट नवीन आहे असे त्यांना जाणवते किंवा एखादी गोष्ट पहिल्यांदाच ऐकतात तेव्हा ते आश्चर्याने आपले डोळे विस्फारून पाहतात; हे पाहून आपल्याला आनंद होत नाही का? पण, जसजसे वय वाढत जाते तसतसे कुतूहलामुळे किंवा काहीतरी नवीन पाहिल्यामुळे होणारे अशाप्रकारचे आश्चर्य कमी होत जाते.
परंतु, आताच उल्लेख केलेल्या बायबल लेखकांच्या बाबतीत मात्र ही भावना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भिनली होती. शिवाय ती खूप वर्षांपर्यंत टिकून होती. असे का? कारण, त्यांनी देवाच्या कार्यांवर प्रशंसापूर्वक मनन करण्याद्वारे आश्चर्याची भावना स्वतःत विकसित केली होती. स्तोत्रकर्त्याने अशी प्रार्थना केली: “पुरातन काळी तू केलेल्या गौरवशाली अद्भुत कृत्यांचे मी स्मरण करतो.”—स्तोत्र १४३:५, सुबोध भाषांतर.
देवाच्या आधुनिक दिवसांतील उपासकांमध्येही ही आश्चर्याची भावना दिसून येते हे खरोखरच किती प्रशंसनीय आहे! तुमच्यामध्ये ती आहे का? तुम्ही ती विकसित करता का?