वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w03 ५/१५ पृ. ३२
  • चिरकालिक जीवन निवडा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चिरकालिक जीवन निवडा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
w03 ५/१५ पृ. ३२

चिरकालिक जीवन निवडा

आज लोकांसमोर जितक्या आवडी-निवडी आहेत तितक्या पूर्वी कधी कोणाकडे कदाचित नसतील. जसे की, कोणत्या प्रकारचा पेहराव करावा, काय खावे, कोणते काम करावे, कोठे राहावे हे सहसा लोक आपल्या आवडी-निवडींनुसार ठरवतात. जगातील अनेक भागांत, विवाह सोबती निवडणे देखील एक सामान्य प्रथा आहे. परंतु बायबलमध्ये एका अशा निवडीविषयी सांगितले आहे जी इतर सर्व आवडी-निवडींपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे—एक अशी निवड जी प्रत्येक मानवाला करता येते.

बायबल म्हणते: “ज्याच्या ठायी अढळ नीति असते त्याला जीवन प्राप्त होते; जो दुष्कर्मामागे लागतो तो आपणावर मृत्यु आणितो.” (नीतिसूत्रे ११:१९) आणि येशू ख्रिस्ताने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३.

होय, आपल्या निर्माणकर्त्याने आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेणारे मार्गाक्रमण निवडण्याची एक संधी दिली आहे! सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल?

बायबल म्हणते: “न्याय्यत्वाच्या मार्गांत जीवन आहे.” (नीतिसूत्रे १२:२८) सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर असलेल्या न्यायी अथवा धार्मिक लोकांपैकी आपण एक असू शकतो. ते कसे? आपले जीवन देवाच्या इच्छेच्या व त्याच्या आज्ञांच्या एकमतात आहे की नाही याची खात्री करण्याद्वारे. (मत्तय ७:१३, १४) तेव्हा आपण उचित निवड करून सार्वकालिक जीवनाचे देवाकडून मिळणारे बक्षीस प्राप्त करू या.—रोमकर ६:२३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा