“मला देवाबद्दलची जास्त माहिती नव्हती”
“गेल्या वर्षापासून यहोवाचे साक्षीदार माझ्या घरी येऊन मला देवाच्या राज्याविषयीची अद्भुत माहिती सांगत आहेत. मी आठ वर्षांपासून कॅथलिक होतो पण मला देवाबद्दलची जास्त माहिती नव्हती. या एका वर्षात मी बरेच काही शिकलो आहे. टेहळणी बुरूज मासिक १३९ [आता १४६] भाषांत प्रकाशित केले जाते हे वाचून मला खूप आनंद वाटला. सर्व भाषेच्या लोकांना देवाचा संदेश माहीत करून दिला जात आहे हे खरोखरच किती आश्चर्यकारक आहे,” असे भारतातील केरळ येथे राहणाऱ्या एका गृहस्थाने लिहिले.
देवाविषयी माहीत करून घेणे अशक्य आहे असा पुष्कळ तत्त्ववेत्त्यांचा दावा असला तरी, प्रेषित पौलाने हे स्पष्टपणे सांगितले की हे शक्य आहे. “अज्ञात देवाला” समर्पित असलेल्या एका वेदीजवळ उपासना करणाऱ्या अथैनीकरांच्या एका गटाला उद्देशून पौलाने म्हटले: “ज्यांचे तुम्ही अज्ञानाने भजन करिता ते मी तुम्हाला जाहीर करितो. ज्या देवाने जग व त्यांतले अवघे निर्माण केले तो . . . जीवन, प्राण व सर्व काही . . . स्वतः सर्वांना देतो; आणि त्याने एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे.”—प्रेषितांची कृत्ये १७:२३-२६.
पौलाने आपल्या श्रोत्यांना निर्माणकर्त्याची ओळख करून घेण्यास आर्जवले; कारण, “तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.” (प्रेषितांची कृत्ये १७:२७) खऱ्या देवाबद्दलची आणि त्याच्या आकर्षक गुणांबद्दलची माहिती देण्यास यहोवाच्या साक्षीदारांना आनंद वाटेल.