वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w03 १/१५ पृ. ३
  • हे सैतानाचे शतक होते का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हे सैतानाचे शतक होते का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • मिळती जुळती माहिती
  • मानवी दुःख
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • शोकांतिका युद्धाची
    सावध राहा!—१९९९
  • ‘क्रांतिकारी बदल’
    सावध राहा!—२०००
  • आनंदहीन जगात आनंदी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
w03 १/१५ पृ. ३

हे सैतानाचे शतक होते का?

“या शतकाला सैतानाचे शतक म्हणण्यास हरकत नाही. या पूर्वीच्या कालखंडात कधी लोकांनी जाती, धर्म किंवा वर्गभेदामुळे लाखो लोकांची कत्तल करण्याची इतकी जबरदस्त प्रवृत्ती आणि इच्छा दाखवली नव्हती.”

नात्सींच्या मृत्यू छावण्यांमध्ये डांबलेल्या निर्दोष लोकांच्या सुटकेच्या ५० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, जानेवारी २६, १९९५ रोजी द न्यू यॉर्क टाईम्समधील एका संपादकीय लेखात वरील अभिप्राय व्यक्‍त करण्यात आला. नात्सींच्या शासनातील हत्याकांड, इतिहासातील सर्वात प्रसिद्ध असलेली एक कत्तल, यात सुमारे ६० लाख यहूद्यांना ठार मारण्यात आले. “विस्मृत हत्याकांड” असे नाव पडलेल्या कत्तलीत सुमारे ३० लाख गैर-यहुदी पोलिश नागरिकांना ठार मारण्यात आले.

“१९०० ते १९८९ पर्यंतच्या काळात, युद्धामध्ये ८.६ कोटी लोक ठार मारले गेले,” असे जॉनथन ग्लोवर, मानवजात—विसाव्या शतकातील नैतिक इतिहास या आपल्या पुस्तकात म्हणतात. ते पुढे म्हणतात: “विसाव्या शतकातील युद्धांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांचे प्रमाण चक्रावून टाकणारे आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांची सरासरी संख्या देणे खोटे ठरेल कारण दोन महायुद्धांमध्ये जवळजवळ दोन-तृतीयांश (५.८ कोटी) लोक ठार झाले. परंतु, हे मृत्यू सबंध [विसाव्या शतकाच्या] कालावधीदरम्यान घडले असते तर युद्धात प्रती दिवशी सुमारे २,५०० लोक ठार झाले असते; अर्थात, सलग नव्वद वर्षे प्रती तासाला १०० हून अधिक लोक.”

परिणामतः, २० वे शतक हे मानवजातीच्या इतिहासातील सर्वात रक्‍तरंजित शतक म्हटले जाते. आशेच्या विरुद्ध आशा (इंग्रजी) यात नद्येझदा मनद्यीलस्ताम या लिहितात: “माणुसकीची तत्त्वे लाथाडली जाऊन, पायांखाली तुडवली जाऊन वाईटाचा विजय झालेला आपण पाहिला आहे.” चांगले आणि वाईट यांच्या संघर्षात वाईटाचा खरोखर विजय झाला आहे का?

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

U.S. Department of Energy photograph

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा