वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w02 ११/१५ पृ. ३२
  • उत्तम नैतिक दर्जांचा पुरस्कार करणारे प्रयत्न

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उत्तम नैतिक दर्जांचा पुरस्कार करणारे प्रयत्न
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
w02 ११/१५ पृ. ३२

उत्तम नैतिक दर्जांचा पुरस्कार करणारे प्रयत्न

सन २००१ च्या शेवटास, रेडिओवर मोझांबिकची राष्ट्रीय आकाशवाणी ऐकणाऱ्‍यांना एक घोषणा ऐकायला मिळाली:

“प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती यांनी मापुटो येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराला भेट दिली. यहोवाच्या साक्षीदारांनी आपल्या शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे कुटुंबांमध्ये उत्तम नैतिक दर्जे वाढवण्याचा व त्यांच्या साक्षरता मोहीमांद्वारे प्रौढ शिक्षणाचा प्रसार करण्याचा आणखी जोराने प्रयत्न करावा, असे त्यांनी या धार्मिक मंडळीला उत्तेजन दिले. जवळजवळ १०,००० लोकांना या कार्यक्रमांचा फायदा झाला आहे. राष्ट्रपती शिशानु यांच्यामते, या देशांत अद्यापही शिक्षणाच्या बाबतीत असलेल्या समस्या सोडवण्यात हा शैक्षणिक कार्यक्रम मोलाचा हातभार लावत असल्यामुळे तो प्रशंसनीय आहे.”

या घोषणेत, राष्ट्रपतींच्या भाषणातील रेकॉर्ड केलेला आणखी एक भाग असा होता: “पुष्कळ लोक साक्षरतेत आवड घेत आहेत हे पाहून आम्हाला खूप आनंद वाटतो. यावरून असे दिसते, की सामान्य नागरीक साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यासाठी आमच्या प्रयत्नांना हातभार लावणार आहेत. यास्तव, मी यहोवाच्या साक्षीदारांना असे साक्षरतेचे आणखी कार्यक्रम, मग ते कोणत्याही भाषेचे असोत, राबवावेत असे त्यांना प्रोत्साहन देऊ इच्छितो. साक्षर असणे सर्वात महत्त्वाचे आहे जेणेकरून लोकांना सुलभतेने एकमेकांबरोबर दळणवळण राखता येईल आणि भवितव्यात शिक्षणात मोठा भाग घेता येईल.”

मोझांबिकमधील यहोवाचे साक्षीदार संपूर्ण देशभर ८५० ठिकाणी साक्षरतेचे वर्ग चालवतात जेणेकरून लोक स्वतःहून देवाचे वचन वाचू शकतील. याशिवाय, यहोवाचे साक्षीदार दर आठवडी जवळजवळ ५०,००० मोफत गृह बायबल अभ्यास देखील चालवतात. हे सर्व एका जागतिक बायबल आधारित शैक्षणिक कार्यक्रमाचा भाग आहे जो २३५ देशांत आज चालू आहे. (मत्तय २४:१४) तुम्ही देखील या कार्यक्रमातून लाभ मिळवू शकता. कृपया निसंकोचपणे तुमच्या भागातील यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा