वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w01 ९/१५ पृ. ३२
  • मध्य आफ्रिकेत देवाचे नाव वापरतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मध्य आफ्रिकेत देवाचे नाव वापरतात
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
w01 ९/१५ पृ. ३२

मध्य आफ्रिकेत देवाचे नाव वापरतात

मध्य आफ्रिकेतील बहुतांश लोक देवावर विश्‍वास ठेवतात. त्यानेच सर्वकाही निर्माण केले याविषयी त्यांना काहीही शंका नाही. (प्रकटीकरण ४:११) पण जगातल्या इतर भागांतील लोकांप्रमाणेच, ते यहोवा या त्याच्या वैयक्‍तिक नावाकडे दुर्लक्ष करतात.

मध्य आफ्रिकेतील व जगाच्या इतर भागांतील लोक, प्रभूच्या प्रार्थनेत “तुझे नाव पवित्र मानिले जावो” असे म्हणताना देवाच्या नावाचा उल्लेख करतात. (मत्तय ६:९) बऱ्‍याच काळापर्यंत, लोकांना ते नावच माहीत नव्हते. पण कालांतराने मात्र यहोवाच्या साक्षीदारांच्या आवेशी प्रचार कार्यामुळे देवाच्या नावाचा वापर करण्यासंबंधी लोकांच्या मनोवृत्तीत बराच फरक पडला आहे. आज ते नाव बऱ्‍याच आफ्रिकी भाषेत लोकांच्या परिचयाचे झाले असून, त्याचा वापरही केला जातो. उदाहरणार्थ, झुलू (ऊजेहोवा), योरूबा (जेहोफा), क्षोसा (ऊयेहोवा) आणि स्वाहिली (येहोफा). पण अजूनही या भाषांतील बायबलच्या भाषांतरांत देवाचे नाव टाळले जाते.

पण याला अपवाद म्हणजे झान्डे भाषेतील एक उत्तम भाषांतर. झान्डे भाषा मध्य आफ्रिकी प्रजासत्ताक, सुदान आणि काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताक या देशांतील काही भागांत प्रचारात आहे. या भागातले लोक त्यांच्या भाषेत देवाच्या नावाचा उच्चार येकोवा असा करतात. एखाद्या प्रादेशिक भाषेत देवाच्या नावाचा उच्चार कसा केला जातो हे महत्त्वाचे नाही तर त्याचा वापर करणे मुळात महत्त्वाचे आहे. का? कारण “जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.”—रोमकर १०:१३.

[३२ पानांवरील नकाशा/चित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

सुदान

मध्य आफ्रिकी प्रजासत्ताक

काँगो लोकशाही प्रजासत्ताक

[चित्राचे श्रेय]

The Complete Encyclopedia of Illustration/J. G. Heck

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा