वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w01 ७/१ पृ. ३२
  • संस्मरणीय ठसा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • संस्मरणीय ठसा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
w01 ७/१ पृ. ३२

संस्मरणीय ठसा

दरवर्षी, यहोवाचे साक्षीदार आपापल्या देशांमध्ये ख्रिस्ती संमलने आणि अधिवेशनांसाठी एकत्र जमतात. आध्यात्मिक स्वरूपाचे उभारणीकारक शिक्षण आणि सहवास प्राप्त करण्यासाठी ते एकत्र जमतात. परंतु, त्यांच्या एकत्रीकरणांच्या इतर पैलूंचाही पाहणाऱ्‍यांवर अमीट ठसा पडू शकतो.

उदाहरणार्थ, जुलै १९९९ मध्ये, मोझांबिक येथे हजारो साक्षीदार एकत्र जमले होते; त्यांनी “देवाचे भविष्यसूचक वचन” प्रांतीय अधिवेशनांच्या तीन दिवसांचा पुरेपूर लाभ घेतला. त्यांच्यापैकी पुष्कळजण पहिल्यांदाच अधिवेशनाला आले होते. व्यासपीठावरून दिल्या जाणाऱ्‍या भाषणांमुळेच नव्हे तर अवतीभोवतीचे वातावरण पाहूनही ते प्रभावित झाले.

मापुटो संमेलन गृहात एका स्त्रीने असे म्हटले: “माझ्या अख्ख्या आयुष्यात मी असे सुंदर ठिकाण पाहिलेले नाही! तिथल्या प्रसाधनगृहात साबण आणि आरसे होते; आणि ती फार स्वच्छ होती. कुठेही मुले भांडताना दिसत नव्हती; अगदी शांत वातावरण होतं. आणि विशेष म्हणजे धक्काबुक्की नव्हती! तरुण लोक आनंदी दिसत होते आणि एकमेकांशी उभारणीकारक संभाषण करत होते. सर्वांचे कपडे पाहूनही मी खूप प्रभावित झाले. पुढच्या वेळेस मी माझ्या मुलांनासुद्धा आणीन आणि माझ्या पतीलाही यायचा आग्रह करीन.”

होय, यहोवाच्या साक्षीदारांचा ईमानदारपणा, सत्यता आणि शारीरिक स्वच्छता यांकडे लोकांचे लक्ष गेल्याशिवाय राहत नाही. साक्षीदार इतरांपासून वेगळे का आहेत? कारण बायबलमधील गोष्टी ते खरोखर अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात. या वर्षाच्या त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनांमध्ये किंवा स्थानीय राज्य सभागृहातील साप्ताहिक सभांमध्ये त्यांच्यासोबत तुम्ही एकत्र होऊ शकता आणि स्वतःच परीक्षण करू शकता.

[३२ पानांवरील चित्र]

झांबिया

[३२ पानांवरील चित्र]

केनिया

[३२ पानांवरील चित्र]

मोझांबिक

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा