‘धार्मिक स्वातंत्र्याबद्दल यहोवाच्या साक्षीदारांचे आभार माना’
“यहोवाचे साक्षीदार तुमच्या घरी येतात तेव्हा लगेच दार बंद करण्याआधी थोडा वेळ थांबून विचार करा, की आपल्याला शरमेने मान खाली घालायला लावेल अशाप्रकारचा छळ त्यांनी अलिकडेच सहन केला आहे. शिवाय, प्रथम सुधारित स्वातंत्र्यात दुरूस्ती घडवून आणण्यात साक्षीदारांचा मोलाचा वाटा आहे, ज्याचा फायदा आपल्या सर्वांना आज होतोय,” असे युसए टुडे नावाच्या बातमीपत्रातील एका लेखात म्हटले होते. संयुक्त संस्थानांत, १९४० च्या दशकादरम्यान यहोवाच्या साक्षीदारांना, झेंडा वंदन करण्यास नकार दिल्याबद्दल आणि इतर कारणांबद्दल खूप छळण्यात आले.—निर्गम २०:४, ५.
यहोवाच्या साक्षीदारांची सुमारे ३० प्रकरणे १९३८ ते १९४३ या पाच वर्षांच्या कालावधीत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात आली होती. त्या लेखात पुढे असेही म्हटले होते: “यहोवाच्या साक्षीदारांनी अनेकदा प्रथम सुधारित स्वातंत्र्यात दुरूस्ती घडवून आणण्याविषयीची प्रकरणे उपस्थित केली, की न्यायाधीश हार्लन फिस्क स्टोन यांनी असे लिहिले: ‘नागरी स्वातंत्र्याच्या संदर्भात उद्भवणाऱ्या कायदेशीर समस्या सोडवण्यास यहोवाच्या साक्षीदारांनी जो हातभार लावला आहे त्याच्याबद्दल त्यांना सरकारने खरे तर निधी पुरवला पाहिजे.’”
म्हणून, लेखाच्या शेवटी असे म्हटले होते: “सर्व धर्मांनी खरे तर धार्मिक स्वातंत्र्याच्या विस्तृतीकरणाबद्दल यहोवाच्या साक्षीदारांचे आभार मानले पाहिजेत.”
[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]
पार्श्वभूमीतील इमारत: Photo by Josh Mathes, Collection of the Supreme Court of the United States; खाली डावीकडे, न्यायमूर्ती: Collection of the Supreme Court of the United States