वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w00 ११/१५ पृ. ३२
  • आंतरिक सौंदर्य कायम टिकणारे असते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आंतरिक सौंदर्य कायम टिकणारे असते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
w00 ११/१५ पृ. ३२

आंतरिक सौंदर्य कायम टिकणारे असते

“तरुण लोक बाह्‍य सौंदर्याच्या आधारावर व्यक्‍तीची परीक्षा करतात.” असे एका वृद्ध ख्रिस्ती बांधवाने म्हटले.

किती खरे आहेत यांचे हे शब्द. मानव नेहमी आंतरिक गुणांपेक्षा बाह्‍य सौंदर्यालाच जास्त महत्त्व देतो; आणि यामुळे तो व्यक्‍तीच्या खऱ्‍या व्यक्‍तिमत्त्वाबद्दल चुकीचे मत बनवतो. आपला निर्माणकर्ता मात्र आंतरिक सौंदर्य पाहतो. आपण बाहेरून दिसायला कसेही असलो तरी तो आपले अंतःकरण पाहतो. यहोवाकडून आपण, कोणत्याही व्यक्‍तीची प्रौढ दृष्टिकोनातून परीक्षा कशी करावी हे शिकू शकतो. बायबलमध्ये तो म्हणतो: “मानवासारखे परमेश्‍वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्‍वर हृदय पाहतो.”—१ शमुवेल १६:७.

खरे सौंदर्य देवाकडून मिळते व त्याच्या वचनात म्हटले आहे, की आपण एखाद्याबद्दल मत बनवतो तेव्हा त्याच्या आध्यात्मिक गुणांना सर्वात जास्त महत्त्व दिले पाहिजे. बायबलमध्ये म्हटले आहे: “सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्‍वराचे भय बाळगणाऱ्‍या स्त्रीची प्रशंसा होते.” (नीतिसूत्रे ३१:३०) एखादी व्यक्‍ती दिसायला खूप सुंदर असेल पण तिचे मन चांगले नसेल तर वरच्या रूपाला काहीच अर्थ राहात नाही. अशी व्यक्‍ती देवाच्या नजरेत अगदीच कुरूप ठरते. (एस्तेर १:१०-१२; नीतिसूत्रे ११:२२) बाह्‍य सुंदरता कालांतराने विरून जाते पण मनाची सुंदरता अथवा आंतरिक सौंदर्य मात्र वाढवता येते, त्यास कायम राखता येते.

यास्तव, बाह्‍य रूपावर भर देण्याऐवजी प्रेम, आनंद, शांती, सहनशीलता, दया, चांगुलपणा, विश्‍वास, सौम्यता व आत्मसंयम यासारखे गुण विकसित करण्यावर आपण भर दिला पाहिजे. (गलतीकर ५:२२, २३) अशाने आपले आंतरिक सौंदर्य वाढेल कारण हेच सौंदर्य कायम टिकणारे आहे.—१ पेत्र ३:३, ४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा