वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w00 ९/१५ पृ. ३२
  • ख्रिस्ती प्रीती फक्‍त बढाई नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ती प्रीती फक्‍त बढाई नाही
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
w00 ९/१५ पृ. ३२

ख्रिस्ती प्रीती फक्‍त बढाई नाही

बार्थलम्यू परिवाराचे घर सामानासहित आगीत जळून भस्म झाले. पण घरातील कोणालाही काही इजा झाली नाही. जवळपासच त्यांचे नातेवाईक राहत होते; त्यांनी त्यांना आसरा दिला. पण कहाणी येथेच संपली नाही.

या कुटुंबातील ओलिव्ह बार्थलम्यू ही एक यहोवाची साक्षीदार आहे; तिच्या मंडळीतले त्याचप्रमाणे आजूबाजूच्या क्षेत्रातील इतर साक्षीदार तिच्या कुटुंबाच्या साहाय्याकरता पैसा गोळा करू लागले. घर पुन्हा बांधायचे ठरले. बांधकामाची देखरेख करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आणि बांधकामाला सुरवात झाली. जवळजवळ २० साक्षीदार बांधकामात हातभार लावत होते; काही शेजारी आणि तरुण लोकही मदतीला धावून आले. तर बाकीच्या लोकांनी चहापाण्याची व्यवस्था केली.

त्रिनीदादच्या सन्डे गार्डियन या वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत ओलिव्ह म्हणाली: “माझ्या कुटुंबातले इतर जण साक्षीदार नाहीत. म्हणून हे सगळे पाहून ते चाट पडले. त्यांच्याकडे याचे वर्णन करायला शब्दच नाहीत. माझ्या पतीला तर अजूनही विश्‍वास बसत नाहीये.”

याविषयी बोलताना बांधकाम समितीचे अध्यक्ष म्हणाले की, अशी कामे खऱ्‍या ख्रिस्ती धर्माची खरी ओळखचिन्हे आहेत. “आम्ही फक्‍त घरोघरी जाऊन प्रीतीविषयी भाषण देत नाही. तर जे बोलतो त्यानुसार करण्याचा प्रयत्न करत असतो.”—योहान १३:३४, ३५.

[३२ पानांवरील चित्र]

ओलिव्ह बार्थलम्यू आपल्या पतीसह

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा