वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w00 ९/१ पृ. ३२
  • मूक संमती

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मूक संमती
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
w00 ९/१ पृ. ३२

मूक संमती

बिट्रेयल—जर्मन चर्चेस ॲण्ड द होलोकॉस्ट या पुस्तकात नात्सी शासनात धर्माची कोणती भूमिका होती याबद्दल उघडपणे चर्चा करण्यात आली आहे. त्या पुस्तकात म्हटले आहे की, “ख्रिश्‍चनांनी नात्सी शासनाला पाठिंबा दिला आणि बहुतांश लोकांनी यहुद्यांच्या छळाबद्दल काहीही आक्षेप घेतला नाही. एका दृष्टीने हे शांत राहून संमती दिल्यासारखेच होते.”

ख्रिश्‍चनांना नात्सी शासनाबद्दलची कोणती गोष्ट आवडली असावी? ते पुस्तक म्हणते की, हिटलरने “जर्मन समाजात शांती आणि व्यवस्था आणली” हे पुष्कळांना आवडले. त्यात पुढे म्हटले आहे: “अश्‍लील साहित्य, वेश्‍याव्यवसाय, गर्भपात, समलिंगी संबंध आणि आधुनिक कलेतील ‘बीभत्सपणा’ यांचा त्याने कडा विरोध केला; त्याशिवाय, स्त्रियांनी घरामध्ये राहून आपली पारंपरिक भूमिका पार पाडावी असे त्याचे मत होते. म्हणून, चार, सहा आणि आठ मुले असलेल्या स्त्रियांना कास्य, रूपेरी किंवा सुवर्ण पदक दिले जायचे. अशाप्रकारे त्याने पारंपरिक मूल्यांना उत्तेजन दिले. या व्यतिरिक्‍त, जर्मनीसाठी निंदात्मक ठरलेला व्हर्सायचा तह त्याने झुगारून आपले लष्करी सैन्य उभारले. या दोन कारणांमुळे पुष्कळांमध्ये त्याचप्रमाणे जर्मनीतल्या बहुतेक ख्रिश्‍चनांमध्ये देखील नात्सी शासनाची लोकप्रियता वाढली.”

एक गट मात्र याला अपवाद होता. बिट्रेयल हे पुस्तक पुढे म्हणते, “यहोवाच्या साक्षीदारांनी कसल्याही प्रकारच्या हिंसेत किंवा सैन्यात सहभाग घ्यायला साफ नकार दिला.” साहजिकच, या लहानशा गटावर हल्ला चढवण्यात आला आणि त्या गटातील अनेकांना छळ छावण्यांमध्ये पाठवण्यात आले. परंतु, स्वतःला ख्रिस्ताचे अनुयायी म्हणवणारे इतरजण मात्र मूग गिळून बसले होते, त्यांनी या कशालाच विरोध केला नाही. ते पुस्तक पुढे असे म्हणते: “कॅथलिक किंवा प्रोटेस्टंट लोकांना यहोवाच्या लोकांबद्दल सहानुभूती वाटणे दूरच राहिले, उलट ते त्यांचा विरोध करू लागले. साक्षीदारांच्या युद्धविरोधी धोरणापेक्षा त्यांना हिटलरची कठोर तत्त्वे जास्त पसंत होती.” ते शांत राहिल्यामुळे साक्षीदारांचा उलट जास्तच छळ करण्यात आला.

नात्सी राजकारणात चर्चची भागीदारी हा अद्याप वादग्रस्त विषय आहे. परंतु बिट्रेयल पुस्तकानुसार, यहोवाच्या साक्षीदारांनी मात्र “नात्सी शासनाला पाठबळ किंवा सहकार्य मुळीच दिले नाही.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा