वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w00 ७/१५ पृ. ३२
  • सत्कर्मांनी देवाचे गौरव करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सत्कर्मांनी देवाचे गौरव करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
w00 ७/१५ पृ. ३२

सत्कर्मांनी देवाचे गौरव करणे

देवावर प्रेम करणारे, त्याच्या वचनातून अर्थात बायबलमधून मिळणारा आध्यात्मिक प्रकाश परावर्तित करण्याचा प्रयत्न करतात. ते येशूच्या या आज्ञेचे पालन करतात: “तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गांतील पित्याचे गौरव करावे.” (मत्तय ५:१६) चांगली बोली आणि योग्य वागणूक यांच्याद्वारेही देवाचे गौरव केले जाऊ शकते.

यहोवाचे साक्षीदार बायबलच्या तत्त्वांनुसार वागण्याद्वारे आणि इतरांना आध्यात्मिक मदत देण्याद्वारे देवाला संतुष्ट करू पाहतात. ज्या देशांमध्ये त्यांना जाहीरपणे सेवाकार्य करायला सरकाराकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही तेथेही ते असेच करत असतात. अशाच एका देशाच्या राजधानी शहरात साक्षीदारांची वार्षिक अधिवेशने भरवली जातात आणि तेथे ६,००० ते ९,००० लोक उपस्थित राहतात. भव्य प्रदर्शने भरवल्या जाणाऱ्‍या सभागृहात हे मेळावे भरवले जातात. मागील वर्षांप्रमाणेच शेकडो साक्षीदारांनी १९९९ मधील अधिवेशनाआधी देखील सभागृहांची सफाई करण्यासाठी आणि साऊंड सिस्टम बसवण्यासाठी व हजारो खुर्च्या लावण्यासाठी पुष्कळ परिश्रम केले.

ही सर्व तयारी लोकांच्या नजरेतून सुटली नाही; सभागृहाच्या व्यवस्थापक मंडळाच्या नजरेतूनही नाही. शिवाय, १५,६६६ लोक उपस्थित राहिलेले असतानाही काहीच गोंधळ न होता सर्वकाही सुरळीत पार पडले होते. अधिवेशनानंतरही चांगल्याप्रकारे साफसफाई केल्याचे पाहून तर ते अधिकच प्रभावित झाले.

व्यवस्थापक मंडळ इतके खुश होते की त्यांनी पुढच्या वर्षी देखील साक्षीदारांच्या कार्यक्रमाला पहिली संधी द्यायचे ठरवले. एवढेच नव्हे, तर जुलै १५, १९९९ रोजी त्यांनी अधिवेशन समितीला प्रशंसेचे एक पारितोषिकही दिले. त्या स्मृतिशिलेवर “यहोवाच्या साक्षीदारांची मंडळी” असे कोरले होते. ज्या देशामध्ये साक्षीदारांच्या बायबल शिक्षणाला अद्यापही मान्यता नव्हती तेथे असे घडणे अनपेक्षितच होते.

सन २०००/२००१ सालांमध्ये संपूर्ण जगभरात यहोवाच्या साक्षीदारांची “देवाच्या वचनानुसार आचरण करणारे” असा विषय असणारी शेकडो प्रांतीय अधिवेशने भरवली जाणार आहेत. त्यांसाठी कोट्यवधी लोक उपस्थित राहतील. तुम्हीसुद्धा तेथे उपस्थित राहून बायबलनुसार प्रामाणिकपणे चालणारे लोक देवाला गौरव आणणारी सत्कर्मे कशी करतात हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकाल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा