वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w00 ६/१५ पृ. ३२
  • हिंसाचाराचा अंत कोण करील?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हिंसाचाराचा अंत कोण करील?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
w00 ६/१५ पृ. ३२

हिंसाचाराचा अंत कोण करील?

संयुक्‍त राष्ट्राचे सेक्रेटरी जनरल कोफी अन्‍नन यांनी १९९९ सालच्या सप्टेंबर महिन्यात संयुक्‍त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीचे स्वागतपर भाषण दिले. द टोरोन्टो स्टार दैनिकातील वृत्तानुसार, त्यांनी या भाषणात सर्व जागतिक नेत्यांना असे आव्हान दिले: “जगातल्या असंख्य लोकांना आपल्याकडून केवळ सहानुभूतीच्या दोन शब्दांची अपेक्षा नाही. हिंसाचाराचे दुष्ट चक्र थांबवण्याचा आणि मनुष्याला समृद्धीची वाट दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न नेटाने करत राहणाऱ्‍या नेत्यांची त्यांना गरज आहे.”

संयुक्‍त राष्ट्रसंघातून आणि त्यातील सदस्य राष्ट्रांतून ‘प्रामाणिक प्रयत्न नेटाने करत राहणारे नेते’ आपल्याला मिळतील का? सदर दैनिकातच अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे शब्द उद्धृत केले होते: “या शतकात झालेल्या रक्‍तपाताचा विचार केल्यावर आपण लगेच म्हणतो, ‘आता आम्ही पुन्हा कधी असे घडू देणार नाही;’ असे म्हणणे सोपे आहे, पण प्रत्यक्ष करून दाखवणे तितके सोपे नाही.” ते पुढे म्हणतात: “लोकांच्या अपेक्षा खूप वाढवणे चुकीचे आहे; हे त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्याइतकेच अक्षम्य आहे.”

जवळजवळ २,५०० वर्षांआधी संदेष्टा यिर्मया याने मनुष्याबद्दल असे म्हटले होते: “हे परमेश्‍वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) मग मनुष्याच्या प्रयत्नांनी हिंसाचाराचा अंत होईल अशी आपण अपेक्षा करू शकतो का?

यशया ६०:१८ या वचनात आपण वाचतो: “तुझ्या देशात कसलाहि जुलूम अगर तुझ्या सीमांच्या आत उजाडी व नाश यांचे नावहि ऐकू येणार नाही.” परमेश्‍वराने आपल्या बंदिवान लोकांना त्यांच्या मायदेशी परत आणले तेव्हा या भविष्यवाणीची पहिल्यांदा पूर्तता झाली. पण लवकरच आपल्या काळात याची भव्य पूर्तता होणार आहे. यहोवा देव निव्वळ ‘लोकांच्या अपेक्षा वाढवत’ नाही. तो सर्वशक्‍तिमान निर्माणकर्ता असल्यामुळे “हिंसाचाराचे दुष्ट चक्र” थांबवणे केवळ त्यालाच शक्य आहे. देवाच्या राज्यात सर्वत्र शांती राहील. हिंसाचार कायमचा नाहीसा झालेला असेल!—दानीएल २:४४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा