पक्षपाती शिक्षकावर पालक नाराज
इटलीच्या कॅसानो मुर्ज येथील एका शिक्षकाने आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना काही स्टीकर्स वाटले. आणि आपापल्या घराच्या बेलजवळ हे स्टीकर्स लावायला सांगितले. त्या स्टीकर्सवर लिहिले होते: “आम्ही कॅथलिक आहोत. यहोवाच्या साक्षीदारांना येथे प्रवेश नाही.”
कित्येक विद्यार्थ्यांचे पालक यहोवाचे साक्षीदार नव्हते पण तरीदेखील त्यांनी या शिक्षकाचा कडाडून विरोध केला. म्वोविटी म्वोविटी नावाच्या एका मासिकात याविषयी बातमी छापून आली होती. त्या बातमीत असा आरोप करण्यात आला होता की, ‘अशा कृत्यांद्वारे मुलांच्या कोवळ्या मनात इतरांच्या धर्माविषयी द्वेष उत्पन्न केला जातो. आणि हे अगदी चुकीचे आहे.’ एका पालकाने तर म्हटले, की ते स्टीकर ‘जणू एक जंगली बी आहे ज्यामध्ये मुलांच्या मनात द्वेष आणि पक्षपातासारखी रानटी वृक्ष निर्माण करण्याची ताकद आहे.’
या बातमीवरून असे दिसते, की द्वेषाचे बी मनांत पेरण्याचा किती भयानक परिणाम होऊ शकतो याची पुष्कळ सुजाण लोकांना जाणीव आहे. केवळ इटलीतच नव्हे तर संपूर्ण जगात यहोवाचे साक्षीदार करत असलेल्या ख्रिस्ती सेवेबद्दल या लोकांना आदर वाटतो. तेव्हा, या साक्षीदारांच्या ‘ठायी जी आशा आहे’ तिच्याबद्दल त्यांना विचारायला काय हरकत आहे? त्यांना तुमच्याशी “आदराने” चर्चा करायला नक्कीच आवडेल.—१ पेत्र ३:१५, ईझी टू रीड भाषांतर.