वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w00 ४/१५ पृ. ३२
  • यहोवाच्या नजरेत मौल्यवान देणगी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या नजरेत मौल्यवान देणगी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
w00 ४/१५ पृ. ३२

यहोवाच्या नजरेत मौल्यवान देणगी

हे पत्र मोझांबिक येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयाला मिळाले होते:

“मी सात वर्षांचा आहे. मी प्रायमरी स्कूलमध्ये जातो. मी एक कोंबडीचं पिल्लू पाळलं होतं. ते पिल्लू मोठं झालं. मी ते १२,००० मेटिकाईसला [जवळजवळ ४३ रुपये] विकलं. यहोवानं माझ्या पिल्लाला मोठं केल्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. मी दिलेल्या देणगीचा उपयोग यहोवाच्या राज्यासाठी होणाऱ्‍या कामाकरता करावा असं मला वाटतं.

“टीप: माझ्या बाबांनी मला हे पत्र लिहायला मदत केली.”

काही लोकांना वाटते, की धनीक लोकच उदार असतात. पण बायबलमध्ये आपल्याला एका गरीब विधवेविषयी वाचायला मिळते जिने दान पेटीत फक्‍त ‘दोन टोले’ टाकले. यावरून, तुम्ही दान पेटीत किती टाकले हे नव्हे तर पूर्ण मनाने टाकले की नाही हे यहोवा पाहत असतो.—लूक २१:१-४.

आपली देणगी मोठी असो किंवा लहान, ती पूर्ण हृदयाने दिली पाहिजे आणि अशा देणगीची यहोवा कदर करतो. यहोवाचे अनुकरण करून अगदी खुल्या व उदार मनाने जे लोक त्याच्या राज्यासाठी आपला वेळ, आपली शक्‍ती किंवा आपली धनसंपत्ती देतात अशांना यहोवाही विपुल आशीर्वाद देतो.—मत्तय ६:३३; इब्री लोकांस ६:१०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा