बायबलचे अभूतपूर्व वितरण
आज पहिल्यापेक्षा जास्त लोकांकडे बायबल आहे. युनायटेड बायबल सोसायटीच्या एका अहवालावरून हेच दिसून येते, की १९९८ या वर्षी त्याच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत बायबलच्या पाच लाखांपेक्षा जास्त प्रतींचे वितरण झाले. आतापर्यंत संपूर्ण जगात बायबलच्या पूर्ण किंवा अंशतः ५८,५०,००,००० पेक्षा जास्त प्रती वितरीत झाल्या आहेत. या अहवालाने असे म्हटले: “ही आनंदाची गोष्ट आहे. कारण आज अनेकानेक लोकांच्या हाती देवाचे वचन पोहंचले आहे.”
पण एक गोष्ट मात्र खरी, एखाद्याजवळ बायबल आहे म्हणजे तो ते वाचतोच असे नाही. उदाहरणार्थ, एका सर्वेतून हे दिसून आले, की ९० टक्के अमेरिकी लोकांकडे बायबलची किमान एक प्रत आहे आणि त्या सर्व लोकांचा हा विश्वास आहे, की बायबलमधून अनेक नैतिक मूल्ये आणि तत्त्वे शिकायला मिळतात. पण त्यांपैकी केवळ ५९ टक्के लोकच मार्गदर्शनासाठी, सल्ल्यासाठी बायबलकडे वळतात. आणि २९ टक्के लोकांनी हे मान्य केले, की त्यांना बायबलविषयी “फारच कमी” किंवा “काहीएक” माहिती नाही.
यहोवाचे साक्षीदार बायबलची छपाई आणि त्याचे वितरणच करत नाहीत, तर २३० पेक्षा जास्त देशांत मोफत बायबल अभ्यास देत आहेत. या बायबलच्या शैक्षणिक कार्यक्रमाचा आज संपूर्ण जगात लाखो लोक लाभ घेत आहेत. येणाऱ्या समस्यांना कसे तोंड द्यावे आणि देवाच्या राज्याधीन कशाप्रकारच्या वैभवी भवितव्यात आपल्याला राहता येईल याचे शिक्षण त्यांना दिले जाते.—यशया ४८:१७, १८; मत्तय ६:९, १०.
[३२ पानांवरील चित्रे]
बोलिव्हिया, घाना, श्रीलंका आणि इंग्लड या देशांतील गृह बायबल अभ्यास (वरून डावीकडून)