आमच्या पाळकांना “जागं कसं करता येईल?”
हाप्रश्न अलीकडेच फॅमी क्रेटयन (ख्रिस्ती कुटुंब) या फ्रेंच कॅथलिक मासिकात विचारण्यात आला; पण या प्रश्नामुळे अनेकांना आश्चर्य असं काही वाटलं नाही. ब्रिटनच्या कार्डिनल ह्यूम यांनी देखील चर्चच्या पाळकांना “निद्रिस्थ राक्षस” असं म्हटलं. पाळकांना जागं करण्याकरता इतरांना प्रचार करणाऱ्या पॅरिश-आधारित गटांनी एक नवीन मार्ग सुचवला आहे. “नवनवीन पद्धतींनी सुवार्तेचं काम करा” असं इटलीच्या एका पाळकानं म्हटलं. अलीकडे पोपने देखील असं करण्याकरता चर्चच्या लोकांना सांगितलं असलं, तरी आपल्या विश्वासाविषयी इतरांना जाऊन सांगावं, असं लोकांना वाटत नाही.
मिलन, इटली येथील पिजी पेरिनी नामक पाळक अलीकडेच आफ्रिकेला गेले होते तेव्हा ते तेथील एका ननला भेटले; तिने त्यांना असं सांगितलं: “मी इथं मागील ४० वर्षांपासून आहे आणि आफ्रिकेच्या संस्कृतीला कोणत्याही प्रकारचा धक्का पोहंचू नये म्हणून येशूच्या नावाचा कधी उल्लेख केला नाही.” या पाळकाने शेवटी असं म्हटलं: “आम्ही येशूविषयी बोलण्याचं, त्याला मानण्याचं आणि शुभवर्तमानाचा प्रचार करण्याचं केव्हाच थांबवलं आहे!” पण त्याचवेळी असेही लोक आहेत ज्यांच्याकरता प्रचार कार्य फार महत्त्वाचं आहे आणि आध्यात्मिकरित्या जागं राहण्याचा तो एक उत्तम मार्ग असल्याचं ते मानतात. पिजी पेरिनी यांनी हे मान्य केलं: “तुम्हाला बाजारामध्ये येशूविषयी बोलताना किंवा त्यांच्या काखेत बायबल असल्याचं कोणी दिसलंच तर आम्हाला लगेच कळतं, की ते यहोवाचे साक्षीदारच आहेत!”
लाखो लोकांना यहोवाच्या साक्षीदारांसोबत देवाच्या वचनावर चर्चा करायला आवडतं. तुमच्या आसपास देखील बायबलविषयी चर्चा करण्याकरता त्यांनी निश्चितच योजना केली असेल. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांप्रमाणे यहोवाचे हे आवेशी साक्षीदार इतरांना आपल्या आशेविषयी सांगण्याकरता एकमेकांना उत्तेजन देत असतात. त्यांच्या सभांच्या ठिकाणी (ज्याला राज्य सभागृह म्हटलं जातं) तुमची प्रेमळ आणि आनंदी लोकांशी भेट होईल. तर मग, यहोवाच्या साक्षीदारांच्या एखाद्या सभेला तुम्ही का हजर होत नाही आणि तुम्हाला तुमची आध्यात्मिक सुस्ती कशी घालवता येईल हे तुम्ही प्रत्यक्षच का पाहत नाही?