वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 १०/१ पृ. ३२
  • त्यांनी ‘खऱ्‍या देवाचे भय बाळगले’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • त्यांनी ‘खऱ्‍या देवाचे भय बाळगले’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 १०/१ पृ. ३२

त्यांनी ‘खऱ्‍या देवाचे भय बाळगले’

इस्राएली लोक इजिप्तच्या दास्यत्वात होते तेव्हा, शिप्रा आणि पुवा नावाच्या दोन इब्री सुईणींवर एक अतिशय भयानक काम सोपवण्यात आले. फोफावणाऱ्‍या यहुदी लोकसंख्येवर आळा बसवण्याच्या प्रयत्नात, फारोने या दोन स्त्रियांना आज्ञा दिली होती: “तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करीत असता . . . मुलगा असला तर त्यास जिवे मारा.”—निर्गम १:१५, १६.

शिप्रा आणि पुवा यांना ‘खऱ्‍या देवाचे भय’ असल्यामुळे त्यांनी धैर्य एकवटले आणि “मिसरी राजाच्या हुकमाप्रमाणे” केले नाही. त्याऐवजी त्यांनी सर्व मुलग्यांना जिवंत ठेवले; हे कार्य कदाचित त्यांच्या जीवावर बेतू शकत होते तरीदेखील त्यांनी धैर्य दाखवले. यहोवाने ‘त्या सुइणींचे कल्याण केले,’ व जीवन रक्षक कार्ये केल्याबद्दल त्यांना प्रतिफळ दिले.—निर्गम १:१७-२१.

यहोवाची सेवा करणाऱ्‍यांची तो प्रशंसा करतो यावर हा अहवाल जोर देतो. शिप्रा आणि पुवा यांनी केलेले कार्य धैर्याचे असले तरी माणुसकीच्या दृष्टीने कोणीही त्यांच्या ठिकाणी असते तर त्यांनीही तेच केले असते असा तो विचार करू शकत होता. नाहीतरी, कोणती स्त्री आपल्या हातांनी तान्ह्या बाळांचा जीव घ्यायला धजेल! तरीपण, यहोवाने ही वस्तुस्थिती नक्कीच विचारात घेतली, की काही लोक कधीकधी मनुष्याच्या भीतीला बळी पडून अघोरी कृत्येही करतात. त्यामुळे या सुईणींनी, फक्‍त माणुसकीनेच प्रवृत्त होऊन नव्हे तर ईश्‍वरी भय व भक्‍ती यांनी प्रवृत्त होऊन हे कार्य केले होते.

आपल्या विश्‍वासू कार्यांची दखल घेणाऱ्‍या देवाची आपल्याला सेवा करायला मिळाली आहे त्याबद्दल आपणही किती कृतज्ञ असले पाहिजे! हे खरे आहे की, आपल्यातील कोणाला शिप्रा आणि पुवा यांच्यासारख्या परीक्षेला तोंड द्यावे लागले नसेल. पण, जे उचित आहे त्यासाठी—मग शाळेत असो, नोकरीच्या ठिकाणी असो अथवा इतर प्रसंगी असो—आपण दृढ राहतो तेव्हा यहोवा आपल्या एकनिष्ठ प्रीतीला हलके समजत नाही. तर “त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” (इब्री लोकांस ११:६) होय, “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.”—इब्री लोकांस ६:१०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा