वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ६/१५ पृ. ३२
  • सौंदर्यप्रसाधनांपेक्षाही चांगले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सौंदर्यप्रसाधनांपेक्षाही चांगले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ६/१५ पृ. ३२

सौंदर्यप्रसाधनांपेक्षाही चांगले

आपले सौंदर्य खुलवण्यासाठी स्त्रिया ज्या ‘बाह्‍य साधनांचा’ उपयोग करतात त्यांच्या संदर्भात प्रेषित पेत्राने पुढील सल्ला दिला: “देवाच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान असे अविनाशी सौंदर्य म्हणजेच सौम्य व शांत वृत्ती तुमच्या हृदयात खोलवर रुजलेली असावी.”—१ पेत्र ३:३, ४, मराठी कॉमन लँग्वेज बायबल.

यासंबंधी लक्षात घेण्याजोगी एक बाब आहे. या बाह्‍य शृंगाराविषयी लिहिताना प्रेषित पेत्राने कॉस्मॉस या ग्रीक शब्दाचे एक रूप वापरले; “खासकरून चेहऱ्‍याचे सौंदर्य खुलवणारी साधने” या अर्थाच्या इंग्रजीतल्या “कॉस्मेटिक” शब्दाची व्युत्पत्ती याच ग्रीक शब्दातून झाली आहे. याचा अर्थ, पेत्र सौंदर्यप्रसाधनांचा आणि इतर कोणत्याही सौंदर्य साधनांचा उपयोग न करण्याचा नियम ख्रिस्ती स्त्रियांवर लादत होता का? देवाच्या वचनात कोठेही असे सुचवलेले नाही. उलट, बायबल याविषयी वैयक्‍तिक निवड करण्याची परवानगी देते; त्यामुळे प्रत्येकाची आवडनिवड थोडीफार वेगळी असेल हे अपेक्षितच आहे.

पण सौंदर्यप्रसाधनांचा अत्यधिक उपयोग केल्यास, किंवा बहुतेक जणांना खटकेल अशी बटबटीत रंगरंगोटी केल्यास त्या व्यक्‍तीबद्दल काय कळून येते? कठोरपणा, उद्धटपणा, दिखाऊपणा, भपकेबाजपणा किंवा गर्विष्ठपणा यांसारखेच गुण दिसून येत नाहीत का? खरे तर अशाप्रकारच्या दिखाऊ शृंगारामुळे तिच्या सौंदर्यात भर तर पडत नाहीच, उलट लोकांच्या मनात तिच्या चारित्र्याविषयी शंका येण्याची शक्यता असते.—पडताळा यहेज्केल २३:३६-४२.

हे लक्षात घेता, “देवभक्‍ति स्वीकारलेल्या” स्त्रीने सौंदर्यप्रसाधनांचा उपयोग केलाच तर आपल्या चेहऱ्‍यावरून मर्यादशीलता, सौम्यता, दयाळूपणा आणि भिडस्तपणा दिसून येईल अशाप्रकारे तिने शृंगार करावा. या गुणांमुळे तिचे लावण्य, मोहकपणा अधिकच खुलेल. किंबहुना, तिने सौंदर्यप्रसाधनांचा उपयोग केलाच नाही तरीसुद्धा तिच्या व्यक्‍तिमत्त्वातून एकप्रकारची गरिमा आणि आंतरिक सौंदर्य दिसून येईल. वर दिलेल्या पेत्राच्या शब्दांतून सुचवल्यानुसार सौंदर्यप्रसाधनांपेक्षाही चांगले काहीतरी आहे याची तिला जाणीव असल्याचे त्यातून दिसून येईल.—१ तीमथ्य २:९, १०.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा