वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ५/१५ पृ. ३२
  • हिंसा—लवकरच कायमची नाहीशी होईल!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • हिंसा—लवकरच कायमची नाहीशी होईल!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ५/१५ पृ. ३२

हिंसा—लवकरच कायमची नाहीशी होईल!

“देशभरात हिंसेचे थैमान”—द न्यूयॉर्क टाईम्स, संयुक्‍त संस्थाने.

“हिंसा आता आपल्या दारात”—ओ ग्लोबो, ब्राझील.

“हिंसेला बळी पडताहेत जगभरातील स्त्रिया”—द ग्लोब ॲन्ड मेल, कॅनडा.

उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील वृत्तपत्रांतील या काही ठळक मथळ्यांवरून जगभर पसरत चाललेल्या एका चिंताजनक वस्तुस्थितीचा अंदाज येतो. जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच केलेल्या एका विधानानुसार, “मागच्या काही दशकांत सर्व प्रकारचा हिंसाचार कमालीचा बोकाळला आहे.”

या चिंताजनक आकडेवारीचा विचार करा:

मनुष्यहत्या. लॅटिन अमेरिका आणि कॅरिबीयन येथे दररोज जवळजवळ १,२५० लोक हिंसक मृत्यूला बळी पडतात. यामुळे, “या प्रदेशातल्या निम्म्या देशांत खून हे १५-२४ वयोगटातील तरुणांच्या मृत्यूचे दुसरे मुख्य कारण बनले आहे.”

लहान मुलांवर हिंसाचार. मुलांवर होणाऱ्‍या शारीरिक, लैंगिक आणि भावनात्मक अत्याचारासंबंधीच्या समस्या सबंध जगभर अस्तित्वात आहेत. उदाहरणार्थ, “औद्योगीकरण झालेल्या बऱ्‍याच देशांत घेतलेल्या प्रौढांच्या सर्वेक्षणावरून असे निदर्शनास येते की, १०-१५ टक्के लहान मुलेमुली लैंगिक अत्याचाराला बळी पडतात—यांपैकी बहुतेक मुलीच आहेत.”

स्त्रियांविरुद्ध हिंसा. १९९७ साली जगभरात झालेली मानवी हक्कांच्या उल्लंघनाची प्रकरणे तपासून पाहता, संशोधकांना असे आढळले की, “जगातल्या जवळजवळ प्रत्येक देशात स्त्रियांना झालेल्या दुखापतींचे एक मुख्य कारण म्हणजे घरात होणारी मारहाण.” (ह्‍युमन राइट्‌स वॉच वर्ल्ड रिपोर्ट १९९८) ही समस्या जगव्याप्त असून सहसा याविषयी तक्रार नोंदवली जात नाही; त्यामुळे घरात होणाऱ्‍या मारहाणीला आता “चारभिंतीत घुसमटणारी २० व्या शतकातली समस्या” म्हटले जात आहे.—द ग्लोब ॲन्ड मेल, कॅनडा.

नोहाच्या दिवसांतही पृथ्वी अशीच “जाचजुलमांनी भरली होती.” (उत्पत्ति ६:९-१२) पण यहोवाने “अभक्‍तांच्या जगावर जलप्रलय आणिला,” तेव्हा त्याने “नीतिमत्त्वाचा उपदेशक” नोहा यास त्याच्या कुटुंबासमवेत जिवंत ठेवले. आपल्या दिवसांतही देव अशाचप्रकारे कार्यवाही करेल. अभिवचन दिलेल्या आपल्या नव्या जगात या पृथ्वीचे एका सुंदर परादीसात रूपांतर करण्याआधी तो जेव्हा हिंसक आणि दुष्ट लोकांचा उच्छेद करील, तेव्हा ‘भक्‍तिमान लोकांचे’ तो रक्षण करील. (२ पेत्र २:४-९; ३:११-१३) हिंसा लवकरच कायमची नाहीशी होणार हे जाणून तुम्हाला आनंद वाटत नाही का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा