वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 २/१ पृ. ३२
  • ‘मुलास शिक्षण दे’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘मुलास शिक्षण दे’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 २/१ पृ. ३२

‘मुलास शिक्षण दे’

यशस्वी बागकाम म्हणजे जमिनीवर फक्‍त बिया पसरून द्यायच्या आणि काही महिन्यांनंतर कापणीसाठी पुन्हा यायचं असं नाही. जमीन तयार करण्यात, बिया लावण्यात, पाणी घालण्यात आणि रोपं चांगली मोठी व्हावीत म्हणून त्यांची निगा राखण्यात खूप काम असतं.

या कामाच्या सत्यतेचे उदाहरण नीतिसूत्रे २२:६ मधील शब्दांवरून दिसून येईल; तेथे म्हटले आहे: “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” खरंच, पालकीय प्रशिक्षण, यशस्वीरीत्या मुलांचे संगोपन करण्यातील प्रमुख कारण आहे.

परंतु आजच्या बेबंद जगात, अनेक पालक या सल्ल्याकडे लक्ष देत नाहीत. चालत आलेल्या रुढीनुसार जेव्हा ते विचार करतात, की आपल्या मुलांनी स्वतःहून समस्या सोडवण्यास शिकलं पाहिजे, तेव्हा बहुतेकवेळा त्यांच्या मुलांनाच स्वतःची काळजी घ्यावी लागते. यामुळे त्यांच्यावर सहजपणे अनैतिक व विवेकरहित लोकांचा हानीकारक परिणाम होऊ शकतो.—नीतिसूत्रे १३:२०.

तेव्हा, पालकांनी आपल्या मुलांमध्ये लहानपणापासूनच ईश्‍वरी शिक्षणाद्वारे ख्रिस्ती तत्त्वे बिंबवणे किती उत्तम आहे बरे! लहानपणापासून म्हणजे? प्रेषित पौल म्हणतो: “बालपणापासून.” तरुण तीमथ्याच्या बाबतीत हे खरे होते. त्याची आई युनिके आणि आजी लोईस यांनी तीमथ्यमध्ये ‘पवित्र शास्त्र’ असे बिंबवले होते की तो ते ‘शिकला’ आणि ‘त्याची खातरी झाली.’ याचा परिणाम? या प्रशिक्षणाने त्याला “तारणासाठी ज्ञानी” बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.—२ तीमथ्य १:५; ३:१४, १५.

तसेच आज, ‘चांगले करण्याचा कंटाळा’ न करणारे पालक ‘खचले नाहीत’ तर त्यांच्या पदरी विपुल पीक पडेल. (गलतीकर ६:९) सुज्ञ राजा शलमोन म्हणतो: “धार्मिकाचा बाप फार उल्लासतो.”—नीतिसूत्रे २३:२४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा