वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ९/१५ पृ. ३२
  • एकोणीसाव्या शतकाला धुळीस मिळवणारे युद्ध

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एकोणीसाव्या शतकाला धुळीस मिळवणारे युद्ध
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ९/१५ पृ. ३२

एकोणीसाव्या शतकाला धुळीस मिळवणारे युद्ध

१९१४

नव्या हजार वर्षांचा विचार करताना, दी ओलँडो सेंटीनल या वृत्तपत्राचे स्तंभलेखक, चार्ली रिस यांनी लिहिले: “एकोणीसाव्या शतकाला धुळीस मिळवणारे १९१४-१८ चे युद्ध अद्याप संपलेले नाही.” या त्यांच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? त्यांनी याचे स्पष्टीकरण दिले: “इतिहासावर तारखांचे नियंत्रण नसते. श्रद्धा, गृहिते, मनोवृत्ती आणि नैतिकता असलेल्या एकोणीसाव्या शतकाचा अंत जानेवारी १, १९०१ रोजी झाला नाही, तर १९१४ मध्ये झाला. अशाचप्रकारे व्याख्या केलेल्या विसाव्या शतकाची सुरुवातही तेथूनच झाली. . . .

“वास्तविक पाहता, आपल्या जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व झगड्यांचा उगम या युद्धापासून आहे. आपण स्वीकारलेल्या जवळजवळ सगळ्याच बौद्धिक व सांस्कृतिक प्रघातांचा जन्म देखील या युद्धातूनच झाला. . . .

“मला असं वाटतं की यामुळे बरीच हानी झाली, कारण मानव स्वतःच्या नशीबावर नियंत्रण करू शकतात असा लोकांचा जो विश्‍वास होता, तो यामुळे चक्काचूर झाला. . . . या युद्धाने लोकांना त्यांचा खोटा विश्‍वास सोडायला भाग पाडले. युद्धात सहभागी असलेल्या कोणालाही वाटले नव्हते की हे असे घडेल. त्याने ब्रिटिश आणि फ्रेंच साम्राजांचा विध्वंस केला. ब्रिटिश, फ्रेंच आणि जर्मन लोकांची एक चांगली अख्खी पिढीच त्याने नाहीशी केली. त्या युद्धामुळे बोल्शेव्हिक क्रांती, झायनवाद, आणि कालांतराने नात्सीवाद, यांचा उदय झाला. अगदी थोड्या काळात त्याने १ कोटी १० लाख लोकांचा जीव घेतला.”

एकशेवीसपेक्षा अधिक वर्षांपासून यहोवाचे साक्षीदार १९१४ या वर्षाला येशूने ज्याला “परराष्ट्रीयांची सद्दी” म्हटले त्याकडे अंगुली दर्शवितात. (लूक २१:२४) या वर्षी, पुनरुत्थित व गौरवी येशू ख्रिस्त, स्वर्गीय राज्याचा राजा या नात्याने सिंहासनारूढ झाला. या शतकाला चिन्हांकित करणाऱ्‍या सर्व पीडा, यहोवा देव याच राज्याद्वारे मिटवून टाकेल.—स्तोत्र ३७:१०, ११; उपदेशक ८:९; प्रकटीकरण २१:३, ४.

[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]

U.S. National Archives photo

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा