वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ५/१५ पृ. ३२
  • उत्तम आचरणामुळे प्रशंसा होते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उत्तम आचरणामुळे प्रशंसा होते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ५/१५ पृ. ३२

उत्तम आचरणामुळे प्रशंसा होते

यहोवाच्या साक्षीदारांनी “मटेरा—गुहावासाचे विशिष्ट शहर” हा लेख छापल्याबद्दल ला गॅझेट्टा डेल मेझोगिओरनो या इटालियन बातमीपत्राने त्यांची प्रशंसा केली. हा लेख, सावध राहा! नियतकालिकाच्या जुलै ८, १९९७ च्या अंकात छापून आला होता; अनेक भाषांत त्याचे बरेच वितरण झाले होते. सावध राहा! हे नियतकालिक सध्या ८१ भाषांत अनुवादित केले जाते व संपूर्ण जगभरात याच्या १.९ कोटी पेक्षा अधिक प्रतींचा खप होतो. त्या बातमीपत्राने म्हटले की, “[मटेरा] शहराच्या ऐतिहासिक व कलात्मक वारशाची जाहिरात करण्यात” सावध राहा! नियतकालिकाने उन्हाळी विक्रम केला आहे.

सन १९९७ मध्ये, मटेरा शहरात भरलेल्या “देवाच्या वचनावरील विश्‍वास” या प्रांतीय अधिवेशनाबाबत त्या बातमीपत्राने साक्षीदारांची प्रशंसा केली. त्याने म्हटले, की साक्षीदारांनी “ऐन उन्हाळ्यात व तळपत्या उन्हात ४,००० लोकांना [शहराच्या] XXI सेटेंब्रे स्टेडियमवर जमवण्याची कमाल केली; त्यांनी या क्रिडांगण केंद्राची (विशेषतः शौचालयाची) स्वच्छता केली, पुन्हा पेंन्टिग केले आणि महत्त्वाची डागडूजी केली आणि तेही मोफत; आवश्‍यक असलेले साहित्य त्यांनी स्वखर्चाने आणले.”

यहोवाचे साक्षीदार चांगले शेजारी होण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. (मत्तय २२:३७-३९) याशिवाय ते, “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्‍यासाठी की, . . . त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे,” हा शास्त्रवचनीय सल्ला देखील अनुसरतात.—१ पेत्र २:१२.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा