तुम्ही कोणाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवू शकता?
सन १८९३ साली ७४ सामाजिक समीक्षकांचा एक गट, भविष्याची चर्चा करण्याकरता शिकागो वर्ल्ड्स फेर (ते ठिकाण वरती दाखवले आहे.) येथे एकत्रित आला. पुढच्या १०० वर्षांकडे अर्थात १९९३ सालाकडे दृष्टी लावून इतर अनेक भाकितांपैकी पुढे दिलेली काही भाकिते त्यांनी केली: “अनेक लोकांचे वयोमान १५० वर्षे इतके असेल.” “तुरुंगाच्या संख्येत घसरण होईल आणि घटस्फोट अनावश्यक समजला जाईल.” “राज्यकारभार अधिक साधेसोपे झालेले असतील कारण एखाद्या राष्ट्राच्या खऱ्या मोठेपणाचा कल साधेपणाकडेच असतो.”
त्याचप्रमाणे, १९६७ साली वर्ष २००० (इंग्रजी) असे शीर्षक असलेल्या एका पुस्तकाने भाकीत केले: “२००० सालापर्यंत, मनुष्याच्या काही ‘मानव-समान’ बौद्धिक क्षमता ज्यांत कदाचित त्याच्या सौंदर्यशास्त्रीय व सर्जनशील क्षमताही समाविष्ट आहेत यांच्या पातळीवर कॉम्प्युटर येतील, त्यांस जोमदार करतील किंवा त्यांना मागे पाडतील अशी एक शक्यता आहे.” “अधिकतर घरकाम करणाऱ्या माफक किंमतीतल्या यांत्रिक मानवाची कल्पना . . . २००० सालापर्यंत आत्यंतिक रास्त वाटते.”
भवितव्यातील घटना ताडण्यात मानवातील अक्षमता देवाच्या क्षमतेच्या अगदी विरुद्ध आहे. उदाहरणार्थ, वरील भाकितांची तुलना, जवळजवळ २० शतकांपूर्वी आपल्या काळाबद्दल बायबलने जे काही भाकीत केले होते त्याच्याशी करा: “माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांस न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील.”—२ तीमथ्य ३:१-५.
‘शेवटला काळ’ याविषयीचा हा बायबल भविष्यवाद, आपल्या दिवसांत पूर्ण झालेल्या अनेक भविष्यवादांपैकी केवळ एक नमुना आहे. देवाच्या वचनाने असे भाकीत केले होते, की येशूच्या उपस्थितीचे “चिन्ह” यात महायुद्ध, अन्न टंचाई, मऱ्या, भूकंप व देव राज्याच्या सुवार्तेचा विश्वभर प्रचार या गोष्टींचाही समावेश असेल.—मत्तय २४:३-१४; लूक २१:११.
देवाच्या अभिवचनाच्या या बिनचूक तंतोतंतपणामुळेच अनेक शतकांपूर्वी एक बायबल लेखक असे लिहिण्यास प्रवृत्त झाला: “आपला देव परमेश्वर ह्याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यातली एकहि व्यर्थ गेली नाही.”—यहोशवा २३:१४.
होय, आपण विश्वस्त असू शकतो, की देवाची सर्व अभिवचने पूर्णत्वास येतील. आजारपण, गुन्हेगारी, अंमली पदार्थांचे व्यसन, उपासमार आणि युद्ध या सर्वांचा देवाचे राज्य अंत करील—सबंध पृथ्वीच एक परादीस होईल. (स्तोत्र ३७:१०, ११, २९; प्रकटीकरण २१:३, ४) या भविष्यवादाच्या पूर्णतेवर तुम्ही विश्वास ठेवू शकता! कारण आपला निर्माणकर्ता अर्थात “सत्यप्रतिज्ञ” देव याने हे अभिवचन दिले आहे.—तीत १:२; पडताळा इब्री लोकांस ६:१३-१९.
[Picture Credit line on page 32]
Cleveland State University Archive