वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 २/१५ पृ. ३२
  • नरकाविषयीचे सत्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नरकाविषयीचे सत्य
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 २/१५ पृ. ३२

नरकाविषयीचे सत्य

चर्च ऑफ इंग्लंडच्या तत्त्व मंडळाकडून आलेल्या अहवालाने म्हटले, की सरतेशेवटी नरक धगधगती भट्टी नाही; उलट, ते शून्यतेचे अदृश्‍य ठिकाण आहे. तो अहवाल म्हणतो: “या रूपांतराची अनेक कारणे आहेत. त्यांपैकी, ख्रिस्ती विश्‍वासातून तसेच बाहेरून, भीती उत्पन्‍न करणाऱ्‍या धर्माविरूद्ध केलेला नैतिक निषेध तसेच कोट्यवधी लोकांना चिरकाल यातना देणाऱ्‍या देवाचे चित्र आणि ख्रिस्ताद्वारे देवाच्या प्रीतीचे होणारे प्रदर्शन यांमध्ये जमीन अस्मानाचा फरक, ही काही कारणे आहेत.”

केवळ चर्च ऑफ इंग्लंड नरकाविषयीच्या या पारंपारिक दृष्टिकोनामुळे अस्वस्थ झालेले नाही. विविध पंथांतील लोकांना, पापी लोकांस जाळणाऱ्‍या सूड उगवणाऱ्‍या देवाची उपासना करण्यास कठीण वाटते. ड्युक युनिव्हर्सिटीझ डिव्हिनीटी स्कूलमधील धर्म आणि समाजाचे प्राध्यापक जॅक्सन कॅरल म्हणतात: “लोकांना, दयाळू व कुरवाळण्याजोगा परमेश्‍वर हवा. पाप आणि अपराध यांच्याविषयी बोलणे आधुनिक विचाराच्या विरूद्ध आहे.”

यहोवाच्या साक्षीदारांचा, बायबल शिकवते त्याप्रमाणे अनेक वर्षांपासून असा विश्‍वास आहे की नरक, मृत मानवजातीची सर्वसाधारण कबर आहे—यातनेचे अग्निमय ठिकाण नव्हे. ते हा दृष्टिकोन, लोकप्रिय असल्यामुळे नव्हे तर बायबल जे सांगते त्यामुळे बाळगतात की: ‘मृतांना तर कसलीच जाणीव नसते. अधोलोकात [“नरक,” कॅथलिक डुवे व्हर्जन] काही उद्योग, युक्‍ति-प्रयुक्‍ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.’—उपदेशक ९:५, १०.

मृतांच्या अवस्थेविषयीची स्पष्ट समज बाळगून, वॉच टावर संस्थेचे पहिले अध्यक्ष, चार्ल्स टेझ रस्सल यांनी १८९६ मध्ये असे लिहिले: “चिरकालिक यातनास्थळाविषयी पंथ आणि गायनाची पुस्तके तसेच अनेक धर्मोपदेशक जी चुकीची शिकवण देतात ती शिकवण [बायबल]मध्ये कोठेच आढळत नाही. पण बायबलमध्ये, आदामाच्या पापामुळे सर्व वंशाला ‘नरक,’ शिओल, हेडीज मध्ये जाण्याची शिक्षा देण्यात आल्याचे व आपल्या प्रभूच्या मृत्यूद्वारे सुटका करण्यात आल्याचे आपल्याला आढळते खरे; पण हे ‘नरक,’ कबर—मृतावस्था आहे.”

अशाप्रकारे, यहोवाच्या साक्षीदारांनी एका शतकापेक्षा अधिक काळापासून नरकाविषयीचे बायबलमधील सत्य शिकवले आहे.

[३२ पानांवरील चित्र]

चार्ल्स टी. रस्सल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा