वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ११/१५ पृ. ३२
  • ‘इतरांना मदत करण्यात त्यांना आस्था आहे’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘इतरांना मदत करण्यात त्यांना आस्था आहे’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ११/१५ पृ. ३२

‘इतरांना मदत करण्यात त्यांना आस्था आहे’

यहोवाच्या साक्षीदारांविषयी न्यूयॉर्क शहरातील एका पोलिसाने वरील प्रमाणे वक्‍तव्य केले. ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयात पूर्ण-वेळेची स्वयंसेविका म्हणून काम करणाऱ्‍या कॅथलिन बरोबर तो बोलत होता.

जवळच असणाऱ्‍या विहारपथावरील बाकावर कॅथलिन बसली होती, ती दुपारची मधल्या सुटीची वेळ होती, शरद ऋतूतील दिवस असून हवेत उबदारपणा होता आणि लख्ख सूर्यप्रकाश देखील पडला होता. हेडफोन असलेले ऑडियोकॅसेट प्लेअर ती ऐकत होती. ईस्ट रिव्हरच्या पलीकडे असणाऱ्‍या हेलिकॉप्टरतळावर शहराला भेट दिलेल्या पोपला निरोप देण्याची तयारी चालू होती. सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था होती आणि अनेक पोलिस विहारपथावर गस्त घालत होते. त्यांपैकी एकाने कॅथलिनला हटकवले आणि ती काय करीत आहे असे तिला विचारले. कॅथलिनने त्याला उत्तर दिले: “मी रशियन भाषेतील टेप ऐकत आहे. हे पाहा, मी एक यहोवाची साक्षीदार आहे आणि या शहरात वास्तव्यासाठी आलेल्या रशियन भाषिक लोकांना देव राज्याची सुवार्ता सांगण्यासाठी मला रशियन भाषा शिकायची आहे.”

हा पोलिस, न्यूयॉर्क शहरातील गस्त-अधिकारी म्हणून मागील १५ वर्षांपासून काम पाहत होता. त्यादरम्यान आपण यहोवाच्या साक्षीदारांची प्रशंसा हळूहळू करू लागल्याचे त्याने सांगितले. त्याने म्हटले: “मी यहोवाच्या साक्षीदारांना एक संघटित धर्म म्हणून पाहतो ज्या धर्मातील सदस्य समाजातील इतरांना मदत करण्याची प्रामाणिक आस्था बाळगून आहेत.”

यहोवाचे साक्षीदार ते करीत असलेल्या दारोदारच्या प्रचारासाठी जगभरात ज्ञात आहेत. (प्रेषितांची कृत्ये २०:२०) मानवजातीस भेडसावणाऱ्‍या समस्यांवर एकमेव उपाय म्हणून ते देवाच्या राज्याकडे निर्देश करतात त्याचवेळी लोकांना बायबल तत्त्वांचा आपल्या दैनंदिन जीवनांत अवलंब करण्याचे उत्तेजन देऊन त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यास ते त्यांना मदत देखील करतात. उदाहरणार्थ, घरात शिकण्यासाठी प्रेरक वातावरण तयार करावे, अशा प्रकारचा आर्जव साक्षीदार पालकांना करतात. प्रामाणिक आणि विधिचारी होण्यासाठी ते वैयक्‍तिकांना आर्जवतात तसेच मालकास अनमोल वाटतील अशी कौशल्ये आणि गुण संपादन करण्याचे त्यांना उत्तेजन देतात.

होय, समाजातील लोकांना त्यांचे जीवन सुधारण्यात मदत करण्याची यहोवाच्या साक्षीदारांना मनःपूर्वक आस्था आहे. खालील निमंत्रणाला प्रतिसाद देण्यास आपले हार्दिक स्वागत आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा