वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ११/१ पृ. ३२
  • “आम्ही सर्व एकाच वंशातील आहोत”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “आम्ही सर्व एकाच वंशातील आहोत”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ११/१ पृ. ३२

“आम्ही सर्व एकाच वंशातील आहोत”

अलीकडील वर्षांमध्ये धार्मिक कलुषितपणा व जातीयवाद संपूर्ण पृथ्वीवर फैलावला आहे. वांशिक मतभेदांनी, हत्या, छळ आणि इतर लज्जास्पद अत्याचारांना चेतवले आहे. ॲमनेस्टी इंटरनॅशनलच्या एका अहवालानुसार, मानवी हक्कांच्या भंगाने १९९४ मध्ये संपूर्ण जगभरात २३ कोटीपेक्षा अधिक लोकांना आपली घरे सोडून पळून जाण्यास भाग पाडले.

एकट्या र्‌वांडामध्ये, तुत्सी व हुतूंमध्ये झालेल्या हिंसेच्या उद्रेकानंतर सुमारे ५,००,००० लोकांची कत्तल करण्यात आली आणि २०,००,००० पेक्षा अधिक लोक निर्वासित झाले. बल्जियन वृत्तपत्रक, ला स्वार असा अहवाल देते, “शस्त्र घेण्यास नकार दिल्यामुळे खासकरून यहोवाच्या साक्षीदारांचा छळ करण्यात आला.” यहोवाचे साक्षीदार सशस्त्र झगड्यांमध्ये भाग घेत नाहीत. तरीदेखील, हिंसेदरम्यान त्यांच्यातील शेकडोंची कत्तल करण्यात आली. यावरून येशूने आपल्या शिष्यांना जे म्हटले त्याची आठवण आपल्याला होते की, “तुम्ही जगाचे नाही. . . . म्हणून जग तुमचा द्वेष करिते.”—योहान १५:१९.

एक साक्षीदार कुटुंब—उझान टॉब्नॉनॉ, त्यांची पत्नी आणि दोन मुले—किगाली राजधानीत राहत होते. उझान, आपल्या शेजाऱ्‍यांना ख्रिस्ती तटस्थतेचे स्पष्टीकरण देताना नेहमी उष्ण हवामानात भरमसाट वाढणाऱ्‍या बुगनविलिया वेलीबद्दल सांगत असत.—मत्तय २२:२१.

“येथे किगाली मध्ये, बुगनविलियाची लाल, गुलाबी आणि केव्हा केव्हा पांढऱ्‍या रंगाची फुले आढळतात. तरी, ते सर्व एकाच वंशातील आहेत. मानवांच्या बाबतीतही हीच गोष्ट आहे. आपण वेगवेगळ्या कुळाचे, रंगाचे किंवा जातीचे असलो तरी, एकाच वंशाचे आहोत, मानवजातीच्या वंशाचे आहोत.”

त्यांचा शांतिमय स्वभाव व तटस्थ भूमिका असतानाही, एका रक्‍तपिपासू टोळीने टॉब्नॉनॉ कुटुंबाची हत्या केली, ही दुःखाची गोष्ट आहे. असे असले तरी ते सर्व जण विश्‍वासाने मरण पावले. यहोवा देव अशांबद्दल आपले अभिवचन पूर्ण करील आणि ते, पुन्हा कलुषितपणा नसलेल्या जगाचा वारसा प्राप्त करण्याकरता पुनरुत्थित केले जातील याची आपण खात्री बाळगू शकतो. (प्रेषितांची कृत्ये २४:१५) मग, टॉब्नॉनॉ कुटुंब, इतर अनेकांबरोबर “उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्र ३७:११.

तुम्ही भेटीचे स्वागत करणार का?

अशा या त्रस्त जगात, देवाविषयी, त्याच्या राज्याविषयी आणि मानवजातीसाठी असलेल्या त्याच्या अद्‌भुत उद्देशाविषयी बायबलमधून अचूक ज्ञान घेतल्यामुळे तुम्हाला आनंद मिळू शकतो. तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास, किंवा तुमच्या घरी कोणी येऊन तुमच्यासोबत मोफत गृह बायबल अभ्यास करण्याची तुमची इच्छा असेल तर, कृपया Watch Tower, H-58 Old Khandala Road, Lonavla 410 401, Mah., India, किंवा पृष्ठ २ वर दिलेल्या योग्य पत्त्यावर लिहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा