वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ४/१५ पृ. ३२
  • “ते यहोवाचे कार्य आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “ते यहोवाचे कार्य आहे”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ४/१५ पृ. ३२

“ते यहोवाचे कार्य आहे”

हे शीर्षक मेक्सिकोमधील माँतेरे नामक शहराच्या एल नोरटे, या वृत्तपत्रातील एका लेखाचे होते. यहोवाच्या साक्षीदारांच्या एका नव्या संमेलन सभागृहाबद्दलचा तो लेख होता.

माँतेरे हे (उपनगरांचा समावेश करून) २३,००,००० इतकी लोकसंख्या असलेले मेक्सिकोच्या उत्तर भागातील एक शहर आहे व तेथे १९,२०० राज्य प्रचारक आहेत. ३,००० आरामदायक खुर्च्या व वातानुकूल व्यवस्था असलेले एक सुंदर व व्यावहारिक संमेलन सभागृह बांधण्याकरता जवळजवळ दीड वर्ष साक्षीदारांनी एकजुटीने श्रम केले. यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाच्या एका सदस्याने समर्पणाचे भाषण दिले तेव्हा स्थानिक साक्षीदार खूप हर्षित झाले. त्या कार्यक्रमात, माँतेरेमधील कार्याविषयीचा संक्षिप्त इतिहास सांगण्यात आला आणि बांधकामात सहभागी होणाऱ्‍यांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या. मग सभेस उपस्थित असलेल्या ४,५०० लोकांनी समर्पणाच्या भाषणाचा आस्वाद घेतला.

मेक्सिकोमध्ये अलीकडेच बांधण्यात आलेल्या संमेलन सभागृहांपैकी हे तिसरे असून “अधिक, विशाल आणि चांगली राज्य सभागृहे व संमेलन सभागृहे,” यांची मोहीम असे त्याचे वर्णन करण्यात आले आहे.

मेक्सिकोमध्ये ४,४३,००० पेक्षा अधिक प्रचारक व १९९५ च्या स्मारक विधीस १४,९२,५०० इतकी उपस्थिती असल्यामुळे, माँतेरेमध्ये आहे त्यासारखी नवीन संमेलन सभागृहे ईश्‍वरी उद्देश साध्य करण्याकरता नक्कीच यथायोग्य ठरतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा