शुभवर्तमानातील सत्य
सन १९०१ पासून, पी६४ म्हणून ओळखले जाणारे मत्तय शुभवर्तमानाच्या हस्तलिखित प्रतीचे तीन अतिलहान असे खंड, इंग्लंडच्या ऑक्सफर्डमधील मेगडेलेन कॉलेजच्या ताब्यात आहेत. हे खंड सा. युगाच्या दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धातील असतील असा काही काळापर्यंत विद्वानांचा विश्वास होता.
अलीकडेच, जर्मनीतील पॉडरबॉरन येथील भूर्जपत्र हस्तलेख शास्त्रज्ञाचे, कॉरसटेन पी. टीडे नामक एका तज्ज्ञाने, मत्तयाच्या २६ व्या अध्यायातील १० वचनांचे काही भाग असलेल्या पी६४ चे सर्वस्वी परीक्षण केले. त्याचा परिणाम? टसायटश्रिफ्ट फियुर पॉपियूरोलोजी यूंट एपीग्रॉफिक (भूर्जपत्र हस्तलेख शास्त्र व वास्तुलेख शास्त्राचे नियतकालिक) यात लिहिताना, टीडेंनी ऑक्सफर्डच्या खंडांचे वर्णन, “पहिल्या शतकातील, कदाचित (जरी अटळपणे नसले तरी) इ. स. ७० च्या पूर्व काळातले ख्रिस्ती कोडेक्स खंड” असे केले.
टीडेंच्या निरीक्षणामुळे मुद्रणालय व विद्वान वर्तुळात बरीच खळबळ माजली. का बरे? कारण सध्या, सर्वात पुरातन असा स्वीकारला जाणारा शुभवर्तमानाच्या संहितेचा उर्वरित भाग खरा तर पी५२ आहे. तो सा. यु. १२५ च्या काळातला, पण नक्कीच दुसऱ्या शतकाच्या पूर्व काळातील नसून, योहानाच्या शुभवर्तमानाचा एक खंडच आहे.
भूर्जपत्र हस्तलेख खंड पी६४ साठी ठरवलेल्या ह्या नवीन तारखेस विस्तृत स्वीकृती मिळेल की नाही, हे पाहणे अद्याप बाकी आहे. कोणत्याही प्रकारे, आधीची तारीख, पी६४ ला अस्तित्वात असणारा केवळ सर्वात पुरातन शुभवर्तमानाचा खंडच बनविणार नाही. पण मत्तयाचे शुभवर्तमान खरोखर प्रथम शतकात, कदाचित सा. यु. ७० च्या आधी देखील लिहिले असावे हे सूचित करण्यासाठी अधिक पुरावा पुरवते. त्यावेळी येशूच्या जीवनकालातील बहुविध प्रत्यक्ष साक्षीदार शुभवर्तमानातील सत्याला पुष्टी देण्यास अद्याप जिवंत होते.