शांतीची शक्यता आहे का?
“कोठे ना कोठे तरी युद्ध चालूच असणार. हे मानवजातीचे दुःखद सत्य आहे.” अलीकडेच न्यूझवीक नियतकालिकात एका वाचकाकडून आलेल्या पत्रामध्ये हा नैराश्यपूर्ण दृष्टिकोन छापण्यात आला होता. तुम्हीही याजशी सहमत आहात का? युद्ध अपरिहार्य आणि शांती अशक्य आहे का? इतिहासाच्या वास्तविकतेनुसार ठरवले तर या दोन्ही प्रश्नांना होय, असे उत्तर देण्यास आपल्याला जड वाटत नाही. अहवाल जोपर्यंत ठेवले आहेत, मानवजात एकापाठोपाठ युद्धांमध्ये सामील झाली आहे व लोक जसजसे एकमेकांना ठार मारण्यासाठी अधिक परिणामकारक मार्गांना शोधत गेले तसतसे झगडे अधिकाधिक नाशकारक बनले.
याला २० वे शतक अपवाद नाही. होय, या शतकाने यापूर्वी कधीही न झालेली रक्तपाती युद्धे पाहिली आहेत परंतु त्याशिवाय त्याने आणखी काहीतरी नवीन पाहिले आहे. पन्नास वर्षांआधी, अमेरिकेने जपानवर दोन अणुबॉम्ब टाकून आण्विक युगाची सुरवात करून दिली. तेव्हापासूनच्या पाच दशकांत, राष्ट्रांनी आण्विक शस्त्रांचा इतका प्रचंड साठा उभारला आहे, की तो मानवजातीचा कितीतरी पटीने नाश करू शकतो. आण्विक शस्त्रविज्ञानाचे अस्तित्व लोकांना सरतेशेवटी युद्ध करण्यापासून परावृत्त करील का? वस्तुस्थिती या प्रश्नाचे उत्तर देतात. त्यानंतर आजपर्यंत कधी आण्विक बॉम्ब टाकले नसले तरी सन १९४५ पासून लाखो लोक युद्धामध्ये मरण पावले आहेत.
मानवजात इतकी झुंझार का आहे? एन्सायक्लोपिडिआ अमेरिकाना मानवी समाजाच्या काही पैलूंचा उल्लेख करतो जे ऐतिहासिकरित्या युद्धास कारणीभूत ठरले आहेत. त्यामध्ये धार्मिक असहिष्णुता, वांशिकवाद, सांस्कृतिक भेद, भिन्न विचारप्रणाली (जसे की साम्यवाद आणि भांडवलशाही), राष्ट्रीयवाद आणि राष्ट्रीय प्रभुत्वाचा सिद्धांत, आर्थिक परिस्थिती तसेच लष्करशाहीची जनमान्य स्वीकृती यांचाही समावेश आहे. ही यादी वाचत असताना, नजीकच्या भवितव्यात यामधील बहुधा काहींमध्ये बदल होऊ शकेल असे तुम्हाला दिसते का? राष्ट्रे आपले प्रभुत्व टिकवून ठेवण्याचा कमी निर्धार करतील का? लोक कमी वंशवादी होतील का? धार्मिक मूलतत्त्ववादी कमी अत्याग्रही होतील का? याची शक्यता अगदीच कमी आहे.
पण मग, एक ना एक दिवशी सर्व काही चांगले होऊन चिरकाल शांती येण्याची कोणतीच आशा नाही का? होय, एक आशा आहे. या जगात गोंधळ माजत असताना देखील आज शांती प्राप्त करणे शक्य आहे. लाखोंनी ती प्राप्त केली आहे. आम्हास या लोकांपैकी काहींबद्दल तुम्हाला सांगू द्या आणि त्यांच्या अनुभवाचा तुमच्यासाठी काय अर्थ होऊ शकतो ते पहा.