वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ८/१५ पृ. ३२
  • बळी पडलेल्या निरपराधांसाठी सांत्वन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बळी पडलेल्या निरपराधांसाठी सांत्वन
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ८/१५ पृ. ३२

बळी पडलेल्या निरपराधांसाठी सांत्वन

मुलांना बळी देण्याचा धार्मिक विधी—मानवाने आता पर्यंत केलेल्या गुन्ह्यांपैकी सर्वात तिटकारा आणणारा गुन्हा आहे. अशा प्रकारचा तिरस्कृत विधी कधीतरी आचरला गेला असेल यावर काही लोक विश्‍वास ठेवत नाहीत. परंतु फिनीकियन उपासनेच्या या गुणलक्षणास अनेक पुराणवस्तुशास्त्रीय शोधांनी पुष्टी दिली आहे.

उच्चभ्रू कुटुंबीयांतील मुलांना टॅनिट आणि बाल-हमॉन यांसारख्या देवतांना बळी देण्यात येत होते. कारथेजमध्ये क्रॉनस देवताच्या ब्रॉन्झ धातूपासून तयार केलेल्या प्रतिमेला अर्पण म्हणून मुलांना जाळण्यात येत असे; मुलाच्या नातेवाईकांना रडण्यास मुभा नव्हती, असे डायडोरस सिकलस, हा सा. यु. पू. पहिल्या शतकातील इतिहासकार म्हणतो. दुःखाश्रूंमुळे बळी देण्याचे मोल कमी होईल, असा कदाचित त्यांचा विश्‍वास होता.

जेरूसलेमच्या निकट असणाऱ्‍या प्राचीन टोपेथमध्ये अशा प्रकारचा विधी काही काळापर्यंत आचरण्यात येत होता. मोलखच्या पोटाच्या भट्टीत मुलाला टाकत असताना त्याचा आक्रोश ऐकू येऊ नये म्हणून भक्‍तजन डफ वाजवून नृत्य करीत.—यिर्मया ७:३१.

इतरांच्या दुःखाकडे निर्दयीपणे दुर्लक्ष करणाऱ्‍यांवर यहोवाचा क्रोध भडकतो. (पडताळा नीतिसूत्रे २१:१३.) यहोवा मुलांकरता दया दाखवणारा देव असल्यामुळे तो “नीतिमानांचे आणि अनीतिमानांचे पुनरुत्थान” होणाऱ्‍यांमध्ये अशा निरपराध बळी पडलेल्यांचा निश्‍चितच समावेश करील.—प्रेषितांची कृत्ये २४:१५; निर्गम २२:२२-२४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा