रक्त संक्रमणांचा पुनर्विचार
एड्सच्या या अंधकारमय युगात, इस्पितळातील रुग्णाच्या आरोग्याला सर्वात मोठा धोका, शस्त्रक्रियेच्या खोलीत दडून बसू शकतो. “रक्त पुरवठा पूर्णपणे निर्जंतुक करण्याचा एकही संभाव्य मार्ग नाही,” असे डॉ. रिचर्ड स्पेन्स म्हणतात. या डॉक्टरांनी एका पेक्षा अधिक दशकांसाठी, कॅमडेन, न्यूजर्सी, अमेरिकेच्या कुपर्स हॉस्पिटल युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर येथील रक्तहीन शस्त्रक्रियेच्या केंद्राची व्यवस्था पाहिली आहे.
हे केंद्र अनेक यहोवाच्या साक्षीदारांवर उपचार करत आहे यात काही आश्चर्य नाही. हे साक्षीदार बायबल आधारित कारणांमुळे रक्त संक्रमणांना नकार देतात त्याबद्दल सर्वांना माहीत आहे. (लेवीय १७:११; प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) परंतु, गैर-साक्षीदार देखील या केंद्रामध्ये उपचारासाठी येत आहेत कारण त्यांना रक्त संक्रमणाच्या भावी धोक्याची ज्यामध्ये हेपाटायटीस, एड्स आणि इतर रोगांची लागण होण्याची चिंता लागली आहे. “एड्स उद्भवल्यामुळे रक्ताचे परीक्षण करण्याची गरज दिसून आली आहे,” अशी द कुरियर-पोस्ट वीकली रिपोर्ट ऑन सायन्स ॲण्ड मेडिसिन या नियतकालिकाने नोंद केली आहे. “तरीही काही रुग्णप्रकरणे, रक्ताचे परीक्षण करण्याच्या क्रियेतून तपास न होताच सुटू शकतात कारण चाचणीत दिसण्याआधीच काहींना विषाणूची लागण झालेली असेल.”
अशा धोक्यांमुळे, रक्तहीन शस्त्रक्रियेचे केंद्र, रक्त संक्रमणांच्या पर्यायी उपायांचा उपयोग करीत आहे. यामध्ये रुग्णाच्या शरीरातील रक्ताचे पुनर्संक्रमण करण्याच्या क्रियेचा समावेश होतो—ही क्रिया काही साक्षीदारांना काही विशिष्ट परिस्थितीत अनाक्षेपार्ह वाटेल.a आणखी एका उपचारामध्ये, रुग्णाचे रक्त उत्पन्न करण्यास चालना देण्यासाठी औषधांचा उपयोग केला जातो. शिवाय, संक्रमित रक्ताची गरज न भासू देता, प्राणवायू पोहंचविण्याच्या क्रियेस आधार देण्यास, कधीकधी कृत्रिम रक्त पर्यायांचा वापर करण्यात येतो. “यहोवाच्या साक्षीदारांना सर्वात उत्तम वैद्यकीय काळजी हवी असते परंतु त्यांना संक्रमणाला पर्याय हवे आहेत,” असे डॉ. स्पेन्स म्हणतात.
यहोवाचे साक्षीदार, त्यांच्या धार्मिक मतांचा आदर करणाऱ्या डॉक्टरांकडून त्यांना मिळालेल्या सहकार्याबद्दल आणि साहाय्याबद्दल आभारी आहेत. त्यामुळे, त्यांना खरोखरच “सर्वात उत्तम वैद्यकीय निगा” प्राप्त झाली आहे व त्यांनी यहोवा देवासमोर त्यांचा विवेक शुद्ध राखला आहे.—२ तीमथ्य १:३.
[तळटीपा]
a या क्रियेचे सविस्तर वर्णन आणि व्यक्तिगत, जाणीवपूर्वक निर्णय घेण्यात समाविष्ट असलेली कारणे मार्च १, १९८९ च्या टेहळणी बुरूज, पृष्ठे ३०-१ वर दिली आहेत.