वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ५/१५ पृ. ३२
  • देवाचे नाव धारण केलेली नाणी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाचे नाव धारण केलेली नाणी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ५/१५ पृ. ३२

देवाचे नाव धारण केलेली नाणी

येथे दाखवलेल्या चांदीच्या नाण्यांकडे निरखून पाहा. या नाण्यांची निर्मिती १६२७ पासून १६३७ काळात गादीवर असणाऱ्‍या वीलहेल्म पाचवा या जर्मन राजाद्वारे करण्यात आली होती. त्या काळात मध्य युरोप तीस वर्षांच्या युद्धात म्हणजेच कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट यांच्यातील लढ्यात गुंतलेले होते. वीलहेल्म पाचवा याने प्रॉटेस्टंटच्या मोहिमेचे समर्थन केले. या लढ्यास लागणाऱ्‍या प्रचंड किंमतीची गरज भागवण्यासाठी त्याने त्याच्याकडील सर्व चांदीची नाणी बनवली.

मनोरंजक गोष्ट म्हणजे, यातील पुष्कळ नाण्यांवर यहोवा, या देवाच्या नावाला सूर्यवलयामध्ये चार इब्री वर्णात उमटवण्यात आले आहे. माडाचे झाड हे सामर्थ्याचे प्रतीक देखील नाण्यांवर आहे. वादळात हे झाड वाकले तरी देवाच्या संरक्षणामुळे ते उन्मळून पडत नाही, हा या झाडाच्या मागील हेतू आहे. लॅटिन भाषेत नाण्यांवर यहोवा हे नाव लिहिण्यात आले आहे आणि ते त्याच्या संरक्षक काळजीवरील आत्मविश्‍वास प्रकट करते.

देवाच्या संरक्षणाचा धावा करण्याऐवजी देवाच्या नावाचा अशाप्रकारे केलेला वापर खरोखरच व्यर्थ होता कारण मानवजातीच्या हिंसाचारी लढ्यांमध्ये यहोवा कोणाचाही पक्ष घेत नाही. अर्थातच तीस वर्षांपर्यंत चाललेल्या या युद्धाला देवाची स्वीकृती मिळणार नव्हती. फंक आणि वॉग्नल नवीन विश्‍वकोश म्हणतो, “नेमस्त अंदाजानुसार निम्म्यापेक्षा जास्त जर्मन लोक या युद्धकाळात बळी पडले. जर्मनीतील अगणित शहरांचा, उप-नगरांचा, गावांचा आणि शेतमळ्यांचा पूर्णपणे उध्वंस झाला. जवळजवळ दोन तृतीयांश औद्योगिक, शेतकी आणि व्यापारी व्यवस्थांचा नाश झाला.”

या नाण्यांवरील यहोवाच्या नावाच्या वापरामुळे इस्राएलांना दिलेली आज्ञा आठवते: “तुझा देव परमेश्‍वर [यहोवा, NW] ह्‍याचे नाव व्यर्थ घेऊ नको.” (निर्गम २०:७) तथापि, ही नाणी, जर्मनीतील लोक यहोवा या ईश्‍वरी नावाशी फार पूर्वीपासून परिचित असल्याची ग्वाही देतात. हे नाव धारण करणाऱ्‍या देवाला तुम्ही कितपत ओळखता?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा