संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार झांबिया
दक्षिण-मध्य आफ्रिकेच्या केंद्रभागी असलेले झांबिया राष्ट्र—रुंद, अस्थिर मैदानावर १,२०० मीटर उंचीचे पठार आहे. ईशान्येकडील मूचिंगा पर्वतराजी २,१०० मी. उंच आहे. तेथील प्रचंड झँबीझी नदी जगप्रसिद्ध विक्टोरिया धबधबा म्हणून खाली कोसळते तेव्हाचे ते दृश्य अगदी विलोभनीय आहे. या भूवेष्टित राष्ट्राचा दक्षिण कडा या नदीनेच व्यापला आहे. तेथील लोकांमध्ये पुष्कळ विविधता असून तेथे सुमारे ७० वेगवेगळ्या जमाती आहेत. येथे पुष्कळ भाषा असल्या तरीही आठ मुख्य भाषा बोलल्या जातात.
झांबियात १९११ मध्ये एक वेगळीच भाषा स्थापन होऊन इतरत्र फैलावू लागली. तेथे भेटी देण्यासाठी आलेल्यांनी शास्त्रवचनांतील अभ्यास (इंग्रजी) या पुस्तकाच्या प्रती आणल्या आणि तेव्हापासून यहोवाचे साक्षीदार झांबियात बायबल सत्याची “शुद्ध वाणी” पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. (सफन्या ३:९) मृतांच्या स्थितीविषयी अशास्त्रवचनीय विश्वास खास आव्हानात्मक आहे. तेथील लोक जेव्हा सत्य शिकतात आणि अंधश्रद्धांनी त्यांना दास्यत्वात कसे ठेवले होते हे पाहतात त्यानंतरचे परिणाम खरोखरच मुक्त करणारे आहेत!—योहान ८:३२.
उदाहरणार्थ, एक विश्वासू भगिणी कळवते: “माझे मामा अचानक वारले तेव्हा झांबियाच्या संयुक्त चर्चची एक कट्टर सदस्या असलेली माझी आई गोंधळून गेली. एक आठवड्याच्या प्रेत-संस्कार विधीनंतर, ती कशा मनःस्थितीत आहे ते पाहण्यासाठी मी गावी गेले. घरी पोहंचल्यावर मी एका वृद्ध मनुष्याला घरात बसलेले पाहिले. तो निघून गेल्यावर तो कोण होता याची माझ्या आजीला विचारणा केली. तो वैदू असल्याचे तिने सांगितले. माझ्या आईने तिच्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी व त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून या माणसाला पैसे दिले होते. तिच्या म्हणण्याप्रमाणे तो आत्मा ‘भटकत’ होता.
“आजी मला नंतर म्हणाली की माझी भेट त्यांना जणू काय एक आशीर्वाद होती कारण त्या वैदूचे पैसे कोठून द्यावेत याचा त्यांना मोठा प्रश्नच पडला होता. तिने मला पैसे देण्यास सांगितले, परंतु मी एक ख्रिस्ती आहे आणि त्यात भाग घेऊ शकत नाही हे अतिशय युक्तीने समजावून सांगितले. मी तिच्यासोबत स्तोत्र १४६:४, मधून तर्क केला जेथे म्हटले आहे की, मृतांना भावना नसल्यामुळे—कोणताही ‘भटकणारा’ आत्मा वगैरे नाही. आम्ही रोमकर १२:१९ वचनावर देखील विचार केला. मी त्यांच्या निदर्शनास हे आणून दिले की बदला घेणे यहोवाचे काम आहे, आपले नाही. त्यानंतर, मी माझ्या आईला येशूने योहान ५:२८, २९ मध्ये नमूद केलेल्या पुनरूत्थानाच्या आशेबद्दल सांगितले. देवाच्या अभिवचनांवर माझा दृढ विश्वास पाहून ती प्रभावित झाली. लवकरच तिने एका साक्षीदार बहिणीसोबत अभ्यास चालू केला व जलद प्रगती केली. तिने तिच्या पूर्वीच्या धर्माशी असलेला सर्व संपर्क तोडला व देवाला केलेल्या समर्पणाचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेतला. आता ती यहोवाची एक साक्षीदार आहे.”
आणखी एक भगिणी कळवते: “मी माझ्या मामीच्या अंत्यसंस्काराला गेले होते. तेथे गेल्यावर मी पाहिले की माझा मामा आणि मामे भाऊ भूकेने व्याकूळ झाले होते. माझी मामी वारल्यापासून त्यांनी अन्नाचा एक कण देखील घेतला नव्हता. असे का म्हणून मी त्यांना विचारल्यावर त्यांनी मला सांगितले की परंपरेनुसार, त्यांना अन्न बनवण्यासाठी चूल पेटवायची नव्हती. मी त्यांच्यासाठी स्वयंपाक करून देण्यास तयार झाले, परंतु मी जर ही मूर्तीपूजक रीत मोडली तर सर्व जण वेडे होतील अशी कुटुंबातील इतर सदस्यांना भीती वाटू लागली!
“मी त्यांना समजावले की यहोवाची साक्षीदार या नात्याने मी लेवीय १८:३० मध्ये बायबल काय म्हणते त्याचा आदर करते आणि अशा अशास्त्रीय परंपरा पाळत नाही. त्यानंतर मी त्यांना मृतांचे आत्मे (इंग्रजी) हे माहितीपत्रक दाखवले. तेव्हा त्यांना लागलेली धास्ती कमी झाली व मी माझ्या मामासाठी आणि इतर लोकांसाठी स्वयंपाक केला. माझे धैर्य पाहून मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांवर प्रभाव पडला व नंतर ते बायबलचा अभ्यास करण्यास राजी झाले. ते आता बाप्तिस्मा न झालेले प्रचारक आहेत व संपूर्ण कुटुंब लवकरच बाप्तिस्मा घेण्याची आशा धरून आहे.”
सत्याची शुद्ध वाणी, धार्मिक खोटेपणा, विशेषकरून प्रामाणिक लोकांना जखडून ठेवणारे कठोर अयोग्य तर्क यांना उलथून पाडते तेव्हा आपल्याला किती आनंद होतो! यहोवाच्या आशीर्वादाने संपूर्ण पृथ्वीवर शुद्ध वाणी जशी फैलावत चालली आहे तशीच झांबियातही फैलावत आहे.—२ करिंथकर १०:४.
[९ पानांवरील चौकट]
राष्ट्राचे पार्श्वचित्र
१९९४ सेवा वर्ष
साक्ष देणाऱ्यांचा उच्चांक: ८२,९२६
प्रमाण: १०७ जणांसाठी १ साक्षीदार
स्मारक विधीची उपस्थिती: ३,६३,३७२
पायनियर प्रचारकांची सरासरी: १०,७१३
बायबल अभ्यासांची सरासरी: १,०८,९४८
बाप्तिस्मा घेतलेल्यांची संख्या: ३,५५२
मंडळ्यांची संख्या: २,०२७
शाखा दप्तर: लूसाका
[९ पानांवरील चित्रं]
लूसाकाच्या सीमाप्रांतावरील वॉचटावर शाखा सुविधा
[९ पानांवरील चित्रं]
लूसाकाच्या दक्षिणेकडील शिंम्बाला येथे प्रचार