जीवन तुमच्याकरता किती मौल्यवान आहे?
एक किशोरवयीन मुलगा एका इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली उडी टाकल्यामुळे मरण पावला. त्याने एक पुस्तक वाचले होते ज्यामध्ये एका धोकादायक उंचीवरून उडी घेऊन आत्महत्या करण्याबद्दलचे वर्णन दिले होते. ही उडी “वेदना, अस्वस्थता किंवा भय यापासून मुक्त करणारी; म्हणजेच चांगली वाटणारी” आहे असे तिचे वर्णन केले होते. हे पुस्तक जपानमध्ये प्रकाशित झाले होते. या पुस्तकाच्या लेखकाने असा दावा केला की “आत्महत्या ही जीवनाच्या निवडीतील एक आहे” असे केवळ तो सुचवत होता.
आज आत्महत्या करणारे लोकच जीवनासाठी अनादर दाखवतात असे नाही. बेपरवा चालक देखील जीवनासाठी कमी आदर प्रदर्शित करतात. काही चालक तर दारू पिऊन गाडी चालवतात आणि बहुतेकजणांचा वेगाने गाडी चालवल्यामुळे झालेल्या दुर्घटनेतच शेवट होतो.
इतर जण चैनबाजीवर अधिक जोर देऊन दाखवतात की ते जीवनाला किती हलक्या प्रतीचे समजतात. धुम्रपान करणाऱ्यांना जरी हे माहीत असले की धुम्रपान केल्याने मृत्यू येऊ शकतो व तो मंदगतीच्या आत्महत्येचा प्रकार आहे तरीही, ते त्यांची ही सवय थांबवत नाहीत. लैंगिक गोष्टींनी वेडे-पिसे झालेल्या ह्या जगात शुद्धता राखण्याऐवजी, अनेक लोक अशा अनिर्बंध कार्याच्या मागे जातात जे बहुतेकवेळा त्यांना मृत्यूकडे निरवते.
काही तर अजाणतेत खादाडपणा, अतिप्राशन, अपुरा व्यायाम व चैनीच्या जीवनाचा पाठलाग करून त्यांचे आयुष्यमान स्वतःहून कमी करतात. जपानी लेखक शिन्यॉ निशीमारू इशारा देतात: “अनिर्बंध खाण्याच्या सवयी, इंद्रियविज्ञानविषयक कार्य बिघडवून टाकतात आणि केवळ सर्व सुखसोयी व चैनबाजीच्या मागे लागणे हे लोकांमधील जोमाचा पूर्णपणे नाश करतात.” काही लोक, प्राचीन काळच्या लोकांनी जी मनोवृत्ती दाखवली त्यांच्यासारखीच मनोवृत्ती दाखवतात. त्यांनी म्हटले: “उद्या मरावयाचे आहे म्हणून खाऊन पिऊन घ्या.”—यशया २२:१३; १ करिंथकर १५:३२.
होय, आज जीवनाला सर्वत्र अनादर दाखवला जातो. यास्तव, असे विचारणे अगदी उचित ठरते, की जीवन तुमच्याकरता किती मौल्यवान आहे? काही झाले तरी जीवनाची जोपासना करणे आवश्यक आहे का? आमच्या सध्याच्या जीवनापेक्षा अधिक मौल्यवान काही आहे का?