तुम्हाला पवित्र शास्त्राचे मोल वाटते का?
केवळ २०० वर्षांआधी, मेरी जोन्स नावाच्या एका मुलीचा, ॲटलांटिक किनारपट्टीपासून दूर नसलेल्या लेनफीआशेल, या विरळ वेल्श गावात जन्म झाला. तिचे पालक गरीब विणकरी होते—इतके गरीब की पवित्र शास्त्राची एक प्रत घेण्याची देखील त्यांच्यात ऐपत नव्हती. तरीही, त्यांनी पवित्र शास्त्रातील गोष्टी सांगून व त्यांना आठवत असलेल्या वचनांचाच वारंवार उल्लेख करून त्यांच्या मुलीच्या मनात देवाबद्दलचे प्रेम बिंबवले. मेरी नेहमी तिच्या शेजाऱ्यांकडचे वेल्श पवित्र शास्त्र आणून वाचत असे. स्वतःचे एक पवित्र शास्त्र विकत घेण्याच्या ठाम निश्चयाने, तिच्याकडे जे थोडे पैसे होते त्यांना ती जमेल तसे साठवू लागली.
मेरी १६ वर्षांची असताना, म्हणजेच १८०० साली, ४० किलोमीटर दूरवर असलेल्या बॉले नावाच्या एका छोट्याशा गावात, वेल्श पवित्र शास्त्रांची विक्री होत आहे असे तिला कळाले. तिने तेथे चालत जाण्याचा पक्का निर्धार केला. अनवाणी पायांनी डोंगराच्या पलिकडे ती चालत गेली. परंतु, ती तेथे पोंहचण्याच्या आतच सर्व प्रती विकल्या गेल्या होत्या. मेरीला असेही कळाले की तिने जितके पैसे साठवून ठेवले होते ते, फारच कमी होते.
मेरीचे पवित्र शास्त्राबद्दलचे ज्ञान व प्रेम पाहून तेथील स्थानिक पाळकांना तिचा कळवळा आला. तिने केलेल्या या सर्व प्रयत्नानंतरचे तिचे निराशजनक अश्रू पाहून, त्यांनी त्यांची स्वतःची व्यक्तिगत प्रत तिला दिली, व म्हटले: “हे काळजीपूर्वक वाच, नियमितरीत्या त्याचा अभ्यास कर, त्यातील पवित्र शब्दांना तुझ्या स्मरणात जपून ठेव, आणि त्याच्या शिकवणीनुसार जीवन व्यतीत कर.”
ही कहाणी, नंतर लंडनमध्ये रिलिजस ट्रॅक्ट सोसायटीच्या समितीच्या एका सभेत कथन करण्यात आली. तेथे असा निर्णय घेण्यात आला की पवित्र शास्त्राची भाषांतरे, केवळ वेल्शच्या लोकांनाच नव्हे तर संपूर्ण जगभरातील लोकांना पुरवली जावी. या सरळ सुरवातीपासून, अनेक पवित्र शास्त्र संस्थांपैकी १९ व्या शतकातील पहिली संस्था निर्माण झाली. तेव्हापासून, पवित्र शास्त्राच्या विदेशी भाषेतील प्रतींच्या वाढत्या पुनरावृत्त्या येऊ लागल्या.
१८८४ मध्ये कायद्याने संस्थापित झालेली वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी आज, २०० पेक्षा अधिक भाषांमध्ये पवित्र शास्त्र आणि पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याचे साहित्य छापते. संपूर्ण जगभरात, ह्या संस्थेने आधुनिक भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स या पवित्र शास्त्राच्या ७ कोटी २० लाख प्रतींचे वाटप केले आहे. मूळ इब्री व ग्रीक मधून भांषांतरीत केलेले न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन आता पूर्ण किंवा काही भागात १८ भाषांमध्ये उपलब्ध आहे, आणि सध्या १२ आणखी भाषांमध्ये भाषांतरीत केले जात आहे.
जवळजवळ सर्वांनाच पवित्र शास्त्र सुसाध्य झालेले असताना, तुम्ही त्याच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? तुम्हाला पवित्र शास्त्राचे मोल वाटते का? जपून ठेवून त्याचे वाचन करण्यासाठी तुमच्याकडे त्याची एखादी प्रत आहे का?
[३ पानांवरील चित्रं]
मेरी जोन्स आणि तिचे पवित्र शास्त्र यांची कहाणी या पुस्तकातून