वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w93 २/१ पृ. १४
  • तिने बक्षीस मिळवले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तिने बक्षीस मिळवले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
w93 २/१ पृ. १४

तिने बक्षीस मिळवले

“मीया सर्वाबद्दल आपली ऋणी आहे,” एका उच्च माध्यमिक शाळेत शिकणाऱ्‍या कायओ नावाच्या विद्यार्थीनीने, जपान येथील वॉचटावर संस्थेच्या शाखा दप्तरास लिहिले. ती कशा बद्दल एवढी कृतज्ञता व्यक्‍त करत आहे? जपान वाहतूक सुरक्षा संघटनेतर्फे आयोजिलेल्या राष्ट्रीय निबंध स्पर्धेत कायओ हिने प्रथम पारितोषिक पटकावले होते. स्वीडनला एक दौरा हे त्या अमूल्य बक्षिसात समाविष्ट होते.

वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रसिद्ध केलेल्या उत्तम प्रकाशनांबद्दल कायओ गुणग्राहकता व्यक्‍त केली कारण तिला वाटते की त्यामुळेच तिला यश मिळण्यास फार मदत झाली. ह्‍या स्पर्धेच्या व्यतिरिक्‍त, तिने अनेक निबंध स्पर्धेत व जाहीर व्याख्यानात तिच्या शाळेचे प्रतिनिधीत्व केले. “बहुतेक स्पर्धेत,” ती म्हणते, “एक विषय दिला जातो, व विद्यार्थी त्यांच्या निबंधासाठी पुस्तकालयात जाऊन संशोधन करतात. पण, मला ह्‍या सर्व भानगडीत पडावे लागत नाही. मला माझ्या घरातील बुकशेल्फ मध्ये सुंदर माहिती मिळते!” ती पुढे म्हणते: “कोणताही विषय असला, मग तो वृध्दापकाळच्या समस्या असो, निसर्ग, आंतरराष्ट्रीय संबंध हा असो, वा स्वत:मध्ये प्रगती करण्याविषयीचा असो, वॉचटावर किंवा अवेक! मासिकांमध्ये याबद्दल सखोल चर्चा केलेली आढळते.”

तथापि, कायओ हिला फक्‍त प्रकाशनांमधून सहाय्य मिळाले असे नव्हे. ती म्हणते की यहोवाच्या साक्षीदारांकडून मिळालेल्या शैक्षणिक कार्यक्रमाने तिच्या लिहिण्या-वाचण्यात सुधारणा केली, व ह्‍यामुळेच ती त्या स्पर्धेत वरचढ होती. “मला एकदा खरच विद्यापीठात शिक्षण घ्यावयाचे होते, पण मला अशा प्रकारचे शिक्षण कोठे मिळाले असते?” हे ती कबूल करते की तिला मिळालेल्या शिक्षणाचा इतरांनाही फायदा व्हावा ह्‍या कारणास्तव ती आता पूर्ण वेळचे काम करण्याची आशा धरत आहे. निबंधाच्या बक्षीसामुळे कायओ प्रफुल्लित झालेली असली तरी, आता तिचे मन जीवनाचे बक्षीस मिळवण्याच्या प्रयत्नात गुंतले आहे.—फिलिप्पैकर ३:१४. पडताळा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा