वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 १/१ पृ. ६-७
  • नवे जग जवळ आहे!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नवे जग जवळ आहे!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • मिळती जुळती माहिती
  • “पहा! मी सर्व नवे करतो”
    “पहा! मी सर्व नवे करतो”
  • लवकरच सर्व दुःखांना पूर्णविराम!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • एक सुंदर नवीन जग जवळ आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
  • देव भविष्यात काय करेल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 १/१ पृ. ६-७

नवे जग जवळ आहे!

जागतिक आपत्तीत सुधारणा घडविण्याच्या योजनांची कुजबूज आहे. सर्वसाधारणपणे, त्याच्याबद्दल चिंता व सहकाराची भावना, शिवाय जगातील सर्व राष्ट्रांकरवी समन्वय प्रयत्नांच्या पराकाष्ठेस ते उच्चस्वरात हाक देत आहेत. अशी भावना पसरलेली आहे की, जरी परिस्थिती अधिक बिघडत आहे तशी परस्परांची सुरक्षितता राखण्यात राष्ट्रांना आपले श्रेष्ठत्व परत पणास लावण्याची गरज आहे, आणि एक नवे व टिकाऊ जग उदयास आणण्यास एकमेकांच्या संगतीत, काम करण्यास ते प्रेरित करीत आहे. ते असा दृष्टांत बाळगून आहे सभोवतालच्या वातावरणात सुधारणा करण्यास, लष्करी खर्चात मोठी कपात होईल, शिवाय, स्टेट ऑफ द वर्ल्ड १९९० चा अहवाल पुढे म्हणतोः “स्वतःचे मोठमोठे लष्करी तळ बाळगून राहण्यापेक्षा सरकारे, आज जिचा व्याप आणि बळ ही सतत वाढत आहे त्या संयुक्‍त राष्ट्र सभेच्या शांती सेनेवर निर्धारीत राहू शकतील, जी तिच्या सदस्य राष्ट्राविरुद्ध उठलेल्या कोणाही विरोधकाशी सामना देण्याचे बळ व अधिकार राखून आहे.

पण या सर्व योजना, आमच्या सुरवातीच्या पानांवर ज्यांची यादी दिलेली आहे, त्या आम्ही उत्कंठा बाळगून असलेल्या परिस्थितींना आणण्यात अगदीच अपुऱ्‍या पडतात. दुर्बळ मनुष्याचे व्यवहारीक कौशल्य मानवी पापावस्थेस व हावेस सुधारु शकणार नाही. ते पूर्वग्रहांचे आणि मानवी वंशभेदाचे उच्चाटन करु शकणार नाहीत. ते सबंध मानवजातीत निःस्वार्थ प्रीतीचा पाया रोवू शकणार नाही. तसेच ते आजार व मरण यांचा अंत होण्याची कोणतीही हमी देऊ शकत नाही. गुन्हेगारीबद्दल प्रभावीतपणे वाच्यता होत नाही, ना धार्मिक भेदभाव आणि द्वेष दूर करण्याचा उल्लेख. तसेच नैसर्गिक आपत्तींना कसे टाळावे ह्‍यावरील विचारविनिमय तर अशक्य कोटीतच आहेत. राष्ट्रीयत्व, त्याच्या संभाव्य समस्या उद्‌भवण्याच्या क्षमतेसह, अस्तित्वात राहण्याची मुभा बाळगून आहे. मग, नाखुषीतच आम्हास हे निर्णायकपणे म्हणावे लागेल की, मानव हा कोणताही क्रियात्मक उपाय शोधून काढण्यात असमर्थ ठरलेला आहे. तरीही, यावर इलाज आहे. हे खरे की, ज्या सर्व गोष्टींची मानवजात उत्कंठा बाळगून आहे, त्यांचे अभिवचन दिलेले आहे व ते वचन, “जो कधीही लबाड बोलू शकत नाही,” अशा देवाकडून प्राप्त आहे. (तीत १:२) काय करणे आहे हे त्याला ज्ञात आहे, शिवाय त्याच्या संकल्पानुसार जे काही करणे आहे ते साध्य करण्यास त्याजपाशी सूज्ञान, बळ, आणि कौशल्य ही आहेत.—प्रकटीकरण ७:१२; १९:१.

देव वचन देतोः “थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधशील पण त्याचा पत्ता लागणार नाही. लीनजन पृथ्वीचे वतन पावतील. ते उदंड सुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्रसंहिता ३७:१०, ११.

हे सर्व कसे घडविले जाईल? यशया ११:९ याचे उत्तर देतेः “माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे, तशी परमेश्‍वराच्या [यहोवाच्या, न्यू.व.] ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” जो कोणी व्यक्‍तीगतपणे या योजनांशी समरुप होण्यास नकार देईल अशांना जिवंत राहून इतरांच्या शांती स्वास्थ्यात बाधा आणण्यात जिवंत राहू दिले जाणार नाही. त्यापुढे आमच्या सुंदर पृथ्वीचा नाश होऊ दिला जाणार नाही.

“या परमेश्‍वराची [यहोवा, न्यू.व.] कृत्ये पाहा. . . . तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो,” असे स्तोत्रसंहिता ४६:८, ९ वचन देते. (तसेच मीखा ४:३, ४ देखील पहा.) सबंध गोलार्धावर शांती स्थापन करण्यामागील महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय भेदांचा अंत होणार. सहकाराची हमी दिलेली आहे, कारण सबंध जगावर एक सरकार असेल—तेही देवाचे असणार. त्याचे सरकार एक असे राज्य आहे की, “त्याचा कधी भंग होणार नाही.” (दानीएल २:४४) शिवाय त्याचा राजा पुनरूत्थित अमर येशू ख्रिस्त आहे, ज्याचे अधिपत्य न्यायाने व धर्माने चालविले जाईल.—यशया ९:६, ७; ३२:१.

पण हे सर्व, मनुष्याठायीच्या वंशिक अपूर्णतेमुळे व त्यांचेमधील आजार, वेदना, शोक आणि मरण यांच्यामुळे दूषित होऊन त्यात परत बिघाड होणार? नाही. कारण या सर्व गोष्टी गतकाळातील ठरतील. प्रकटीकरण २१:४ आम्हास खात्री देतेः “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील; यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट हीही नाहीत; कारण पहिले होऊन गेले.” वंशिकतेने लागलेल्या पापाची येशू ख्रिस्ताच्या समर्पित खंडणीच्या आधारे क्षमा होईल व मानवजातीस तिच्या पूर्णावस्थेला पोहंचविले जाईल. (रोमकर ६:२३; इफिसकर १:७) शिवाय नैसर्गिक शक्‍तींवर व तिच्या मानवी हानीपासून सृष्टीकर्त्याशिवाय इतर कोण तिजवर अधिक चांगले नियंत्रण ठेवू शकेल?—स्तोत्रसंहिता १४८:५-८; यशया ३०:३०.

ज्या गोष्टीची मनुष्य आशा बाळगून स्वप्न पाहात असतो त्या देव पुरवीत असतो. पण केव्हा? पवित्र शास्त्रातील भविष्यवाद सूचित करतात की, हे बदल ज्या काळात “रा क्रोधाविष्ट” झालेली असतील व मनुष्य पृथ्वीची नासाडी करीत असेल, त्या काळात घडतील. (प्रकटीकरण ११:१८) या जुन्या जगाचे हे शेवटले दिवस असल्याचे चिन्ह, सतत “कठीण दिवस” होत आहेत व त्यांचेशी तोंड देणे अशक्य होत आहे, यावरुन स्पष्ट होत आहे. (२ तीमथ्य ३:१-५, १३) शिवाय येशूने आधीच भाकित केले होते की जी पिढी या गोष्टी घडताना पाहील तीच देवाच्या अभिवचनांची पूर्तताही पाहील.—मत्तय २४:३-१४, ३२-३४.

यास्तव, वेळ काढून पवित्र शास्त्रामधील या अभिवचनांचा शोध घ्या. याच कारणास्तव, विचारवंत व देव हे दोघेही संमती देतात की, नवे जग येण्याची हीच वेळ आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा