तुम्हाला अशा काळाची उत्कंठा लागून आहे का, जेव्हा . . .
◻ तुम्हास तुमच्या घरात, मग तो दिवसाचा कोणताही प्रहर असो, सुरक्षित व निश्चिंत वाटावे?
◻ कोणाही प्रकारची कुलुपे, गज, धोक्याचा गजर, दरवाजातून पाहण्यासाठी असणारे छिद्र, पहारेकरी, राखणदार कुत्रा आणि सुरक्षा उपकरणांची गरज राहणार नाही?
◻ तुम्हाला रस्त्यावर रात्रीच्या वेळीही सुरक्षितपणे एकटे जाता येईल?
◻ घातक औषधे व त्याच्यासोबतच्या समस्या गतकाळातील आठवणी ठरतील?
◻ सर्व प्रकारच्या युद्धांची समाप्ती होईल; तसेच शस्त्रे बनविण्यात येणार नाही व साठवण्यातही येणार नाही?
◻ प्रदुषित अन्न, हवा व पाणी याबद्दल पुढे तुम्हास काळजी करावी लागणार नाही?
◻ दहशतवाद, अपहरण व बॉम्ब स्फोटांच्या धमक्यांचे पूर्णपणे निर्मूलन होईल?
◻ पृथ्वीची नैसर्गिक क्षमता, भौगोलिक संपत्तीचे रक्षण केले जाईल व सर्वांच्या हितासाठी वापरण्यात येईल?
◻ मानवजातीत हाव व स्वार्थ प्रेरक आत्मा म्हणून राहणार नाहीत?
◻ मुले आपला अजाणपणा राखून असतील; तसेच इतरांचा आणि त्यांच्या चीजवस्तुंचा आदर बाळगतील?
◻ स्त्रियांवर कोणताही जुलुम केला जाणार नाही व त्यांचा बळी घेतला जाणार नाही?
◻ कायदे व नियम हे वाजवी असतील आणि सर्वांच्या हितासाठी न्यायाने बजावले जातील?
◻ सरकार आपले निर्णय राजकारणावर नव्हे तर खऱ्या गरजांना अनुसरुन घेईल?
◻ स्वतंत्रता व समता ही केवळ बोलण्याद्वारेच नव्हे तर प्रत्यक्षात आचरली जाईल?
◻ दारिद्य्र पुढे राहणार नाही, तर सर्वांना स्वास्थ, सुस्थिती व सौख्यानंद अनुभवण्यास जे सर्व लागेल ते पुरविले जाईल?
◻ मुले हवीशी वाटतील व त्यांची निगा घेतली जाईल; त्यांना कधीच वाईटपणाने वागविले व त्यागलेही जाणार नाही.
◻ आजार व मृत्यु यावर विजय मिळवलेला असेल, तसेच भयानक पीडाही दिसणार नाहीत.
◻ तुम्हास भेटणारा प्रत्येक जण दयाळू, मदत देणारा व विश्वस्त असेल?
◻ प्रत्येकाच्या जीवनाचे खरे मोल जाणले जाईल, आणि सर्वांना चिरस्थायी सौख्यानंदाचा आनंद मिळू शकेल?
◻ फाजील धर्माभिमान, द्वेष व युद्धे यांना चेतविणारी शक्ती अशा स्वरुपात धर्म राहणार नाही?
◻ सर्वांना पुरेसा व सुखावह निवारा मिळेल; आणि बेघरपणा ही गतकाळातील गोष्ट बनेल?
वरीलपैकी कोणाही गोष्टीबद्दल तुम्ही जर होय म्हणू शकाल तर पुढील लेख वाचण्यास आपणास रस वाटेल.