राज्य घोषकांचा वृत्तांत
अनौपचारिक साक्षीकार्य फलप्राप्ती मिळविते
येशूने एका विहीरीवर शमरोनी स्त्रीला, “मला प्यावयाला पाणी दे,” असे म्हणून अनौपचारिक पण अति प्रभावी साक्ष देण्यास सुरवात केली. (योहान ४:७) आम्हीही आज, अनौपचारिक साक्ष देण्याच्या प्रत्येक संधीला दक्ष राहिलो तर तसेच प्रभावी असू शकतो. ऑस्ट्रेलियातील एका बंधूने बागेतील आसनावर दैनंदिन वचनाचे वाचनाआधारे अनौपचारिक साक्ष देण्यास सुरवात केली. एका चौकसबुद्धीच्या गृहस्थाने ते प्रकाशन पाहिले व म्हटले की, त्यालाही शास्त्रवचनात रस आहे. तो एक नामधारी कॅथोलिक होता. त्याला कॅथोलिक शाळेत उत्क्रांतीचे शिक्षण मिळाले होते. पण आता, कशावर विश्वास ठेवावा हे कळत नव्हते. बंधूने त्याच्यासाठी लाईफ—हाव डिड इट गेट हिअर? बाय एव्होल्युशन ऑर बाय क्रिएशन? या पुस्तकाची तजवीज केली.a दोन दिवसानंतर त्याने ते पुस्तक त्या माणसाच्या कामावर नेले. पण त्याला कळले की, तो गृहस्थ बाहेर गेला आहे. त्याच्या सचिवाने ते पुस्तक जवळजवळ बांधवाच्या हातातून हिसकावून घेतले व तिने म्हटलेः “याच पुस्तकाची आम्ही वाट बघत होतो.”
दोन तासांनी बंधूला त्या गृहस्थाचा फोन आला. त्याने म्हटले की, अजून दोन क्रिएशन पुस्तके आणावीत व त्याच्या दप्तरी त्याची भेट घ्यावी. हा बंधू त्याच्या दप्तरी गेल्यावर तो गृहस्थ व शिवाय आणखी दोघे त्याची वाट पहात असलेले दिसले. यांच्यासोबत आणि सचिवासोबतही एक पवित्र शास्त्र अभ्यास सुरु झाला व बंधूने आठवड्यात दोन वेळा भेट द्यावी अशी योजना करण्यात आली. पुढील काही आठवड्यात त्या गृहस्थाची मैत्रिण, जी “बॉर्न अगेन ख्रिश्चन” गटाची होती तिने, पवित्र शास्त्रावरील प्रश्ने पाठवण्यास सुरवात केली. शेवटी ती, त्या गृहस्थाचे व्यावसायिक भागीदार व मित्र, जे स्वतः उत्क्रांतवादी होते ते, या अभ्यासास बसू लागले.
त्यांचा हा अभ्यास पुढील पाच महिने सुरळीत चालला; आणि आठवड्याचा दुसरा अभ्यास आता बागेत होऊ लागला. मग, सचिवाचा मित्रही अभ्यासात सामील झाला. लवकरच त्या मूळच्या गृहस्थाचा भागीदार व त्याचा मित्र हे अमेरिकेतील इडाहो येथे स्थलांतरीत झाले व तेथे त्यांनी आपला अभ्यास चालू ठेवला. काही आठवड्यांनी त्या मूळ गृहस्थाकडे एक अगदी अपरिचित माणूस आला व त्याने विचारले की, बागेत जी पवित्र शास्त्राविषयीची चर्चा होत होती तिचे पुढे काय झाले. असे आढळून आले की, हा माणूस ती चर्चा लक्ष देऊन ऐकत होता. त्यामुळे त्याच्याबरोबर सुद्धा अभ्यास चालविण्याची योजना करण्यात आली.
या सर्व गोष्टींची फलश्रुती काय घडली? बागेतल्या त्या मूळच्या भेटीनंतरच्या अठरा महिन्यांनी पहिला गृहस्थ, त्याची गतकाळची “बॉर्न अगेन ख्रिश्चन” मैत्रिण विवाहबद्ध होऊन बाप्तिस्मा घेतलेले झाले. सचिव तिचा मित्र हेही विवाहबद्ध होऊन त्यांनी बाप्तिस्मा घेतला. अमेरिकेला गेलेला त्यांचा भागीदार व त्याचा मित्र यांनी देखील बाप्तिस्मा करवून घेतला व यांच्यापैकी एक नियमित रुपात सहाय्यक पायनियरिंगचे कार्य करीत आहे. बागेत चालणारी पवित्र शास्त्रीय चर्चा लक्ष देऊन ऐकणाऱ्या माणसाने आपला अभ्यास चालू ठेवला, तो काही दिवसांनी आयर्लंडमध्ये गेला व तेथे आता बाप्तिस्मा घेण्याच्या विचारात आहे.
हे सर्व केवळ त्या बंधूने आपल्या जेवणाच्या सुटीचा अनौपिचारिक साक्ष देण्यामध्ये चांगला उपयोग केला म्हणून घडले, आणि यहोवाने त्याच्या प्रयत्नांना आशीर्वादित केले. याचप्रमाणे आम्ही देखील, जे सर्व यहोवाच्या राज्याचा संदेश ऐकण्यास भूकेले आहेत अशांना राज्याची सुवार्ता ऐकविण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा उचलू.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रसिद्ध केलेले पुस्तक.