वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ८/१ पृ. ७
  • येशूचा जन्म—केवळ दंतकथा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूचा जन्म—केवळ दंतकथा?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ८/१ पृ. ७

येशूचा जन्म—केवळ दंतकथा?

ख्रिस्ताचा जन्म! ख्रिस्ती धर्मराज्यात वर्षातील मोठ्या सणाचा आधार म्हणून त्याकडे पाहिले जाते. तरीपण, पुष्कळ धर्मपुढाऱ्‍यांनी येशूच्या जन्माविषयी शुभवर्तमानात असणारे अहवाल निव्वळ दंतकथा आहेत असे म्हटले आहे. उदाहरणार्थ, द इन्टरप्रिटर्स बायबल ज्योतिषी किंवा “मागी लोक” यांनी दिलेल्या भेटीबाबत म्हणतेः “ही गोष्ट फुलवून सांगितलेली आहे किंवा प्रत्यक्षात ‘खरी घडली आहे’ हे ठरविण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही. एखाद्या कथेचे मोल किंवा महत्व तिच्या अचूकतेवर अवलंबून नाही; ती गोष्ट एक कलेची कृति आहे असे समजण्यास हवे.”

असे हे टिकाकार बहुदा हा वाद करतात की, ख्रिस्ताच्या जन्माविषयीचे शुभवर्तमानातील अहवाल सविस्तर माहिती देत नसल्यामुळे तो ऐतिहासिक आहे असे मानणे कठीण जाते. परंतु, द लाईफ ॲण्ड टाईम्स ऑफ जिझस द मसाया या आपल्या पुस्तकात आल्फ्रेड इडरशेईम हे नाकारुन म्हणतातः “हे भक्कमपणे सांगितले जाऊ शकते की, अपुरेपणा किंवा पुराव्याचा अभाव असतानाही या घटनेचा अपोक्रायफल किंवा दंतकथा असा अर्थ काढता येऊ शकत नाही. एखादी गोष्ट ही दंतकथा आहे किंवा रुढीप्रमाणे नाही ते ठरविण्याचे दोन मार्ग आहेत व ते म्हणजे, एक, ते त्यांच्या थोर पुरुषांच्या चित्रात प्रकाशवलय दाखवितात आणि दुसरा मार्ग म्हणजे ज्या गोष्टी कधी घडल्या नाहीत त्यांचे सविस्तर वर्णन लिखाणात करणे.”

पण, शुभवर्तमाने येशूच्या जन्माविषयी इतकी थोडी माहिती का देतात बरे? ते यासाठीच की, त्याचा जन्म नव्हे तर मृत्यु महत्वाचा आहे. (मत्तय २०:२८) इडरशेईम आम्हास आणखीन स्मरण देतातः “शुभवर्तमानांचा हेतू येशूचे चरित्र देणे किंवा त्यासाठी साहित्य पुरविणे हा नव्हता; तर त्याचे केवळ दोन उद्देश होतेः एक म्हणजे ही शुभवर्तमाने जे वाचतील त्यांनी ‘येशू, ख्रिस्त असून देवाचा पुत्र आहे असा विश्‍वास ठेवावा’ आणि दुसरे म्हणजे, विश्‍वास ठेवणाऱ्‍यांनी ‘त्याच्या नावामुळे जीवनप्राप्ती करावी.’”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा