वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 ४/१ पृ. २९
  • तुम्ही रागात उत्तर देता का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही रागात उत्तर देता का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 ४/१ पृ. २९

तुम्ही रागात उत्तर देता का?

“मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.” असे नीतीसूत्रे १५:१ म्हणते.

तुम्हाला कोणी रागात आणले तेव्हा तसाच प्रतिकार दाखवून “आपली मनःशांती हरपता” का? त्यामुळे गंभीर परिणामाप्रत निरविले जाईल.

न्यूयॉर्क शहरात एका भोजनगृहात जेवणाची चांगली व्यवस्था नाही असे दिसल्यामुळे एका युवतीने तेथे भांडण करुन आपले डोके संतापून घेतले. ती घरी आल्यावर तिने आपल्या सावत्र बापास ही गोष्ट कळविली. हा बाप त्या खाणावळीच्या मालकाकडे गेला व तेथे त्याची व मालकाची बाचाबाची झाली. परिणाम असा झाला की खाणावळीच्या मालकाने बंदुक काढून त्या बापाला ठार केले.

वर नमूद केलेल्या नीतीसूत्रातील उपदेश अशा प्रसंगी उपयुक्‍त ठरला असता का? अबीगईल व दावीद यांच्यामध्ये घडलेल्या घटनेचा १ शमुवेल २५:२–३५ मधील अहवालाचा विचार करा. अबीगईलचा पती नाबाल याच्याकडून दावीदाचे सेवक परतल्यावर यांनी त्याला घडलेला वृत्तांत सांगितल्यावर निर्माण झालेल्या उद्विग्न स्थितीमुळे दावीदाच्या हातून खूप मोठी चूक घडणार होती. त्यामुळे अजाण रक्‍त सांडले जाणार होते. तरीपण अबीगईल हिने दिलेले मृदु उत्तर व सोबत तिने केलेले दयाळू कृत्य व तिचा नम्रपणा यामुळे दावीद व त्याच्या लोकांचा कोप शमविला गेला.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा