भाग ४ उजळणी
खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा:
१. नीतिवचनं १३:२० वाचा.
आपण विचार करून मित्र निवडणं इतकं महत्त्वाचं का आहे?
(धडा ४८ पाहा.)
२. बायबलमध्ये कोणता सल्ला देण्यात आलाय . . .
पती किंवा पत्नीसाठी?
आईवडील किंवा मुलांसाठी?
३. कशा प्रकारच्या बोलण्यामुळे यहोवाला आनंद होतो? कशा प्रकारचं बोलणं त्याला आवडत नाही?
(धडा ५१ पाहा.)
४. पेहराव निवडताना आपण कोणती तत्त्वं लक्षात घेतली पाहिजेत?
(धडा ५२ पाहा.)
५. तुम्ही यहोवाच्या दृष्टीने चांगलं मनोरंजन कसं निवडू शकता?
(धडा ५३ पाहा.)
६. मत्तय २४:४५-४७ वाचा.
“विश्वासू आणि बुद्धिमान दास” कोण आहे?
(धडा ५४ पाहा.)
७. तुम्ही तुमच्या वेळेचा, शक्तीचा आणि साधनांचा मंडळीच्या कामाला हातभार लावण्यासाठी वापर कसा करू शकता?
(धडा ५५ पाहा.)
८. स्तोत्र १३३:१ वाचा.
तुम्ही कोणकोणत्या मार्गांनी मंडळीची एकता जपू शकता?
(धडा ५६ पाहा.)
९. आपल्या हातून गंभीर पाप झालं तर यहोवाकडून मदत मिळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
(धडा ५७ पाहा.)
१०. १ इतिहास २८:९ आणि तळटीप वाचा.
जेव्हा इतर जण खऱ्या उपासनेचा विरोध करतात किंवा सत्य सोडून जातात, तेव्हा तुम्ही कसं दाखवू शकता की तुम्ही यहोवाला ‘पूर्णपणे समर्पित’ आहात?
यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी आणि खोट्या धर्मापासून दूर राहण्यासाठी तुम्हाला काही बदल करण्याची गरज आहे का?
(धडा ५८ पाहा.)
११. छळाचा सामना करण्यासाठी तुम्ही आतापासूनच तयारी कशी करू शकता?
(धडा ५९ पाहा.)
१२. यहोवाच्या सेवेत प्रगती करत राहण्यासाठी तुम्ही काय करायचं ठरवलंय?
(धडा ६० पाहा.)