भाग ३ उजळणी
खाली दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा:
१. नीतिवचनं २७:११ वाचा.
तुम्हाला यहोवाला एकनिष्ठ का राहायचंय?
(धडा ३४ पाहा.)
२. एखाद्या गोष्टीबद्दल बायबलमध्ये कोणतीही स्पष्ट आज्ञा नसेल, तर तुम्ही चांगले निर्णय कसे घेऊ शकता?
(धडा ३५ पाहा.)
३. आपण सर्व गोष्टींत प्रामाणिक कसं राहू शकतो?
(धडा ३६ पाहा.)
४. मत्तय ६:३३ वाचा.
काम आणि पैशांबद्दल निर्णय घेताना आपण ‘आधी देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न’ कसा करू शकतो?
(धडा ३७ पाहा.)
५. यहोवाप्रमाणेच तुम्हीही जीवनाला मौल्यवान समजता, हे तुम्ही कसं दाखवू शकता?
(धडा ३८ पाहा.)
६. प्रेषितांची कार्यं १५:२९ वाचा.
रक्ताबद्दल यहोवाने जी आज्ञा दिली आहे तिचं तुम्ही पालन कसं करू शकता?
देव आपल्याकडून ज्या अपेक्षा करतो त्या योग्य आहेत असं तुम्हाला वाटतं का?
(धडा ३९ पाहा.)
७. २ करिंथकर ७:१ वाचा.
आपलं शरीर, मन आणि वागणं-बोलणं शुद्ध ठेवण्याचा काय अर्थ होतो?
(धडा ४० पाहा.)
८. १ करिंथकर ६:९, १० वाचा.
शारीरिक संबंधांबद्दल बायबलमध्ये काय सांगितलंय? आणि ते तुम्हाला पटतं का?
मद्यपानाबद्दल बायबलमध्ये काय म्हटलंय?
९. मत्तय १९:४-६, ९ वाचा.
विवाहाबद्दल देवाचे काय स्तर आहेत?
लग्नाची आणि घटस्फोटाची कायदेशीर नोंदणी करणं का गरजेचं आहे?
(धडा ४२ पाहा.)
१०. यहोवाला कोणते समारंभ आणि सणवार आवडत नाहीत? आणि का?
(धडा ४४ पाहा.)
११. योहान १७:१६ आणि प्रेषितांची कार्यं ५:२९ वाचा.
तुम्ही निष्पक्ष कसं राहू शकता?
जर अधिकाऱ्यांनी तुम्हाला देवाच्या नियमाविरुद्ध असलेलं काही करायला सांगितलं, तर तुम्ही काय कराल?
(धडा ४५ पाहा.)
१२. मार्क १२:३० वाचा.
तुमचं यहोवावर प्रेम आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता?